Congress Candidate List | पक्ष सोडण्याची चर्चा असलेल्या म्हेत्रे, अस्लम शेख यांना तिसऱ्या यादीत तिकीट

Congress Candidate List | पक्ष सोडण्याची चर्चा असलेल्या म्हेत्रे, अस्लम शेख यांना तिसऱ्या यादीत तिकीट

काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेल्या माजी आमदार अब्दुल सत्तार यांच्या जागेवर प्रभाकर पालोडकर यांना तर कालिदास कोळंबकर यांनी पक्ष सोडल्यानंतर वडाळ्यातून शिवकुमार लाड यांना काँग्रेसने रिंगणात उतरवलं आहे.

अनिश बेंद्रे

|

Oct 03, 2019 | 8:13 AM

नवी दिल्ली : काँग्रेसने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी आपली 20 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर (Congress Third Candidate List) केली आहे. काँग्रेसमधून बाहेर पडण्याची चर्चा असलेल्या सिद्धराम म्हेत्रे, अस्लम शेख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसने याआधी 103 उमेदवार जाहीर केले असून आता हा आकडा 123 वर पोहचला आहे.

मालाड पश्चिम मतदारसंघातून अस्लम शेख, तर अक्कलकोटमधून सिद्धराम म्हेत्रे या विद्यमान आमदारांना तिकीट देण्यात आलं आहे. शेख आणि म्हेत्रे हे काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा होती. मात्र दोघांचीही तलवार म्यान करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आलेलं दिसत आहे.

काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेल्या माजी आमदार अब्दुल सत्तार यांच्या जागेवर प्रभाकर पालोडकर यांना (Congress Third Candidate List) उतरवण्यात आलं आहे. तर कालिदास कोळंबकर यांनी पक्ष सोडल्यानंतर वडाळ्यातून शिवकुमार लाड यांना रिंगणात उतरवलं आहे. वडाळ्यातून शिवसेनेच्या इच्छुक आणि माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी बंड केल्यास त्यांचंही आव्हान असू शकतं. पंढरपुरातील काँग्रेस आमदार भारत भालके यांच्या गच्छंतीनंतर शिवाजीराव कलुंगे मैदानात उतरत आहेत.

नाशिक मध्यच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांच्याविरोधात शाहू खैरे यांना तिकीट देण्यात आलं आहे. घाटकोपर पश्चिम मधून राम कदम यांच्याविरोधात मनिषा सूर्यवंशी उतरल्या आहेत. वांद्रे पश्चिम मधून आशिष शेलार यांच्याशी आसिफ जकेरिया दोन हात करतील.

काँग्रेसची तिसरी उमेदवार यादी (Congress Third Candidate List)

3 नंदुरबार – मोहन पवन सिंह 9 शिरपूर – रणजीत भरत सिंग पावरा 54 नागपूर पूर्व – पुरुषोत्तम हजारे 55 नागपूर मध्य – ऋषिकेश (बंटी) शेळके 69 अहेरी – दीपक आत्राम 96 परभणी – रवी राज अशोकराव देशमुख 104 सिल्लोड – प्रभाकर पालोडकर 108 औरंगाबाद पश्चिम – रमेश गायकवाड 124 नाशिक मध्य – शाहू खैरे 162 मालाड पश्चिम – अस्लम शेख 170 घाटकोपर पश्चिम – मनिषा सूर्यवंशी 175 कालिना – जॉर्ज अब्राहम 177 वांद्रे पश्चिम – आसिफ जकेरिया 180 वडाळा – शिवकुमार लाड 184 भायखळा – मधुकर चव्हाण 192 अलिबाग – श्रद्धा ठाकूर 250 अक्कलकोट – सिद्धराम म्हेत्रे 252 पंढरपूर – शिवाजीराव कलुंगे 269 कुडाळ – हेमंत कुडाळकर 276 कोल्हापूर उत्तर – चंद्रकांत जाधव

विलासरावांच्या धाकट्या चिरंजीवांना उमेदवारी, काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

काँग्रेसने याआधी जाहीर केलेले 103 उमेदवार

 1. अॅड. के. सी पाडवी – अक्कलकुवा (नंदुरबार)
 2. पद्माकर वळवी – शहादा (नंदुरबार)
 3. शिरीष नाईक – नवापूर (नंदुरबार)
 4. शिरीष चौधरी – रावेर (जळगाव)
 5. हर्षवर्धन सपकाळ – बुलडाणा (बुलडाणा)
 6. अनंत वानखेडे – मेहकर (बुलडाणा)
 7. अमित झनक – रिसोड (वाशिम)
 8. वीरेंद्र जगताप – धामणगाव रेल्वे (अमरावती)
 9. यशोमती ठाकूर – तिवसा (अमरावती)
 10. अमर काळे – आर्वी (वर्धा)
 11. रणजित कांबळे – देवळी (वर्धा)
 12. सुनील केदार – सावनेर (नागपूर)
 13. नितीन राऊत – नागपूर उत्तर (नागपूर)
 14. विजय वडेट्टीवार – ब्रह्मपुरी (चंद्रपूर)
 15. सतीश वर्जूरकर – चिमूर (चंद्रपूर)
 16. प्रतिभा धानोरकर – वरोरा (चंद्रपूर)
 17. बाळासाहेब मंगळूरकर – यवतमाळ (यवतमाळ)
 18. अशोक चव्हाण- भोकर (नांदेड)
 19. डी पी सावंत – नांदेड उत्तर (नांदेड)
 20. वसंतराव चव्हाण – नायगाव (नांदेड)
 21. रावसाहेब अनंतपूरकर – देगलूर (नांदेड)
 22. संतोष टारफे – कळमनुरी (हिंगोली)
 23. सुरेश वर्पूरडकर – पाथरी (परभणी)
 24. कल्याण काळे – फुलंब्री (औरंगाबाद)
 25. शेख आसिफ शेख रशीद – मालेगाव मध्य (नाशिक)
 26. रोहित साळवे – अंबरनाथ (ठाणे)
 27. सय्यद हुसेन – मीरा भाईंदर (ठाणे)
 28. सुरेश कोपरकर – भांडुप पश्चिम (मुंबई)
 29. अशोक जाधव – अंधेरी पश्चिम (मुंबई)
 30. नसीम खान – चांदिवली (मुंबई)
 31. चंद्रकांत हंडोरे – चेंबूर (मुंबई)
 32. झिशान सिद्दीकी – वांद्रे पूर्व (मुंबई)
 33. वर्षा गायकवाड – धारावी (मुंबई)
 34. गणेश कुमार यादव – सायन कोळीवाडा (मुंबई)
 35. अमीन पटेल – मुंबादेवी (मुंबई)
 36. अशोक जगताप – कुलाबा (मुंबई)
 37. माणिक जगताप – महाड (रायगड)
 38. संजय जगताप – पुरंदर (पुणे)
 39. संग्राम थोपटे – भोर (पुणे)
 40. रमेश बागवे – पुणे कँटोनमेंट (पुणे)
 41. बाळासाहेब थोरात – संगमनेर (अहमदनगर)
 42. अमित देशमुख – लातूर शहर (लातूर)
 43. अशोक पाटील निलंगेकर – निलंगा (लातूर)
 44. बसवराज पाटील – औसा (लातूर)
 45. मधुकरराव चव्हाण – तुळजापूर (सोलापूर)
 46. प्रणिती शिंदे – सोलापूर मध्य (सोलापूर)
 47. मौलबी सय्यद – सोलापूर दक्षिण (सोलापूर)
 48. ऋतुराज पाटील – कोल्हापूर दक्षिण (कोल्हापूर)
 49. पी एन पाटील सडोलीकर – करवीर (कोल्हापूर)
 50. डॉ. विश्वजीत कदम – पलुस कडेगाव (सांगली)
 51. विक्रम सावंत – जत (सांगली)
 52. कुणाल पाटील – धुळे ग्रामीण
 53. राजेश एकाडे – मलकापूर
 54. राहुल सिद्धिविनायक बोंद्रे – चिखली
 55. स्वाती संदीप वाकेकर – जळगाव (जामोड)
 56. संजय रामदास बोडके – अकोट
 57. विवेक रामराव पारस्कर – अकोला पूर्व
 58. रजनी महादेव राठोड – वाशिम
 59. अनिरुद्ध सुभानराव देशमुख – अचलपूर
 60. शेखर शेंडे – वर्धा
 61. राजू परवे – उमरेड
 62. गिरिश पांडव – नागपूर (दक्षिण)
 63. विकास ठाकरे – नागपूर (पश्चिम)
 64. सहसराम कारोटे – आमगाव
 65. आनंदराव गेडाम – आरमुरी
 66. डॉ. चंदा कोडावते – गडचिरोली
 67. सुभाष धोटे – राजुरा
 68. विश्वास झाडे – बल्लारपूर
 69. वामनराव कासावार – वणी
 70. वसंत पुर्के – राळेगाव
 71. शिवाजीराव मोघे – आर्णी
 72. विजय खडसे – उंबरखेड
 73. भाऊराव पाटील – हिंगोली
 74. सुरेशकुमार जेठालिया – परतूर
 75. किसनराव गोरंटियाल – जालना
 76. डॉ. तुषार शेवाळे – मालेगाव (बाह्य)
 77. शिरिषकुमार कोतवाल – चांदवड
 78. हिरामण खोसकर – इगतपुरी
 79. शोएब अश्फाख उर्फ गुड्डू – भिवंडी (पश्चिम)
 80. कांचन कुलकर्णी – कल्याण (पश्चिम)
 81. राधिका गुप्ते – डोंबिवली
 82. कुमार खिलारे – बोरिवली
 83. अरविंद सावंत – दहिसर
 84. गोविंद सिंग – मुलुंड
 85. सुनिल कुमरे – जोगेश्वरी (पूर्व)
 86. अजंता यादव – कांदिवली (पूर्व)
 87. कालू करमनभाई बुधेलिया – चारकोप
 88. युवराज मोहिते – गोरेगाव
 89. जगदीश आमीन – अंधेरी (पूर्व)
 90. जयंती सिरोया – विलेपार्ले
 91. प्रविण नाईक – माहिम
 92. उदय फणसेकर – शिवडी
 93. हिरा देवासी – मलबारहिल
 94. डॉ. मनिष पाटील – उरण
 95. नंदा म्हात्रे – पेण
 96. दत्तात्रय बहिरत – शिवाजीनगर
 97. अरविंद शिंदे – कसबा पेठ
 98. धीरज देशमुख – लातूर ग्रामीण
 99. दिलीप भालेराव – उमरगाव
 100. पृथ्वीराज चव्हाण – कराड (दक्षिण)
 101. अविनाश लाड – राजापूर
 102. राहुल खंजिरे – इचलकरंजी
 103. पृथ्वीराज पाटील – सांगली

आघाडीचा फॉर्म्युला

विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी आघाडी केली आहे. दोन्ही पक्ष प्रत्येकी 125-125 जागा लढवणार आहेत. तर मित्रपक्षांसाठी 38 जागा सोडण्यात आल्या आहेत, असं शरद पवार यांनी यापूर्वीच सांगितलेलं आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें