भाजपनं उंटावरुन शेळ्या राखणं बंद करावं, प्रणिती शिंदेंची घणाघाती टीका

आमदार प्रणिती शिंदे यांनी कार्यध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजपवर निशाणा साधला आहे. Praniti Shinde slams BJP

भाजपनं उंटावरुन शेळ्या राखणं बंद करावं, प्रणिती शिंदेंची घणाघाती टीका
प्रणिती शिंदे, काँग्रेस आमदार

मुंबई: काँग्रेसनं महाराष्ट्रासाठी गुरुवारी नवी टीम जाहीर केली आहे. नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली तर प्रणिती शिंदे यांसह शिवाजी मोघे (यवतमाळ), बसवराज पाटील (उस्मानाबाद) , नसीम खान (मुंबई), कुणाल पाटील (धुळे), चंद्रकांत हंडोरे (मुंबई) यांची कार्याध्यक्षपदी निवड केली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी कार्यध्यक्षपदी निवड झाल्यानंतर भाजपवर निशाणा साधला आहे. प्रणिती शिंदे यांनी भाजपाने उंटावरून शेळ्या राखणे आता बंद करावे.जनता आता हुशार झाली आहे, अशी टीका टीव्ही 9 मराठीसोबत बोलताना केली आहे.(Congress Working President and MLA Praniti Shinde slams BJP)

अमित शाह महाराष्ट्रात आले किंवा नाही आले तरी काही फरक पडणार नाही, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या. काँग्रेस पक्षाने दिलेली जबाबदारी ही विश्वासाने पार पडणार आहेय पक्षाची ताकत वाढविण्यासाठी प्रयत्न करणार, सर्वजण पक्षात एक टीम म्हणून काम करणार आहे, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सध्या शक्ती विधेयक ड्राफ्ट होत आहे. महिलांना शक्ती लावणार असून त्यांच्या प्रश्नी आवाज उठवणार आहे. महिलांना संघटित करुन त्यांच्या प्रश्नी अन्यायाविरोधात आवाज उठवणार आहे, असं शिंदे म्हणाल्या. काँग्रेस पक्षानं संधी दिलेले नवीन चेहरे सोशल इंजिनिअरिंग करणारे आहेत. प्रत्येकाचा आवाज हा पक्षश्रेष्ठी पर्यंत पोहोचवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांच्या माध्यमातून जनतेचा आता आवाज सुरू झालाय

भाजपविरोधात देशातील जनतेने आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. भाजपनं उंटावर बसून शेळ्या राखणे बंद करावं.शेतकऱ्यांच्या माध्यमातून आता आवाज सुरू झालायं. या सरकार विरोधात शेतकरी,सामान्य जनतेचा संघर्ष सुरु झाला आहे, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या

अमित शाह यांच्या एन्ट्रीनं फरक पडत नाही

प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एन्ट्रीनं आता फरक पडणार नाही, असं म्हटलंय. लोकं आता हुशार झाले आहेत त्यामुळे ते आले तरी काही फरक पडणार नाही, असं वक्तव्य प्रणिती शिंदेंनी केलं आहे. भाजप नेते नारायण राणेंनी अमित शाह यांच्या पायगुणानं महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार जावं असं म्हटलं होतं.

संबंधित बातम्या:

Maharashtra Congress President | काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांची वर्णी

काँग्रेस हायकमांडनं नियुक्त केलेली टीम नाना पटोले वाचलीत का? एका क्लिकवर सर्व नावं

(Congress Working President and MLA Praniti Shinde slams BJP)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI