मराठा आरक्षणावरुन विरोधकांवर बोलताना पालकमंत्री तानाजी सावंत यांची जीभ घसरली

सत्तांतर झालं की लगेच मराठा आरक्षणाची विरोधकांना खाज सुटली आहे. असं वादग्रस्त वक्तव्य उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.

मराठा आरक्षणावरुन विरोधकांवर बोलताना पालकमंत्री तानाजी सावंत यांची जीभ घसरली
Follow us
| Updated on: Sep 26, 2022 | 7:47 AM

उस्मानाबाद : सत्तेत आल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत महत्त्वाची पावले उचलली. यानंतर आता मराठा समाजाच्या आरक्षणाचा(Maratha reservation) प्रश्न सोडवण्यासाठी शिंदे फडणवीस सरकार प्रयत्नशील आहे. अशातच शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री असलेले तानाजी सावंत(Tanaji Sawant) यांनी मराठा आरक्षणावरुन विरोधकांनर निशाणा साधताना एक वादग्रस्त वक्तव्य(Controversial statement) केले आहे.

सत्तांतर झाल की लगेच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे. असं वादग्रस्त वक्तव्य उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.

उस्मानाबादमध्ये हिंदुत्वगर्जना कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत यांची जीभ घसरली. सत्तांतर झाल्यावरच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली असं वादग्रस्त तानाजी सावंत यांनी केले आहे.

यांना आरक्षण पाहिजे. आता म्हणतात ओबीसी मधून पाहिजे. उद्या म्हणतील एस सी मधून पाहिजे याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत असंही ते म्हणाले.

तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य करताना विरोधकांना ज्या भाषेत सुनावलं त्यावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या काळात दोन वेळा मराठा आरक्षण गेलं असं आरोपही तानाजी सावंत यांनी केला आहे.

ज्या समितीला मराठ्यांना आरक्षण नको आहे अशी समिती त्या सरकारने स्थापन केली होती. त्यामुळे आरक्षण मिळाले नाही. आरक्षणासंदर्भात टिकाऊ आरक्षणाची मागणी असल्याचं सावंत शनिवारी म्हणाले होता.

दरम्यान, शनिवारी बीडमध्ये तानाजी सावंत यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते.  माझ्याकडून साहित्यिक बोलण्याची अपेक्षा करू नका. मुख्यमंत्र्यावर टीका कराल तर बीडमध्ये येऊन नागडं केल्याशिवाय राहणार नाही अशी टीका आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.