Navneet Rana | प्रकृती स्थिर, ICU बाहेर आले, नवनीत राणांनी शेअर केला व्हिडीओ

लीलावतीमध्ये दाखल केले त्यावेळी श्वासोच्छवास करताना त्रास आणि छातीदुखी होत असल्याची तक्रार नवनीत राणा यांनी केली होती.

Navneet Rana | प्रकृती स्थिर, ICU बाहेर आले, नवनीत राणांनी शेअर केला व्हिडीओ

मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पुढील उपचारासाठी मुंबईला आणण्यात आले. त्यानंतर आपण आयसीयूतून बाहेर आलो असून प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती खुद्द नवनीत राणांनीच व्हिडीओ शेअर करत दिली. (Corona Positive Amravati MP Navneet Ravi Rana Health Stable shares video from Lilavati Hospital)

“लीलावती रुग्णालयाच्या आयसीयूमधून आज मला सामान्य कक्षात स्थलांतर करण्यात आले आहे, आता माझी प्रकृती थोडी स्थिर आहे. आपल्या प्रार्थनांमुळे मी मृत्यूच्या दाढेतून बाहेर आले. आपणा सर्वांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. गेले पाच-सहा दिवस मी अमरावती-नागपूर-मुंबई असा प्रवास केला. आपण चिंता करु नका. माझी लहान मुलंसुद्धा काळजी करत आहेत, त्यांनाही मी हा व्हिडीओ पाठवत आहे. मी आणखी चांगली कामं करावी म्हणून देवाने मला पुन्हा संधी दिली. मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार” अशी माहिती नवनीत राणा यांनी दिली.

नवनीत राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सुरुवातीला अमरावतीतील घरीच उपचार करण्यात आले. नंतर त्रास वाढल्याने त्यांच्यावर नागपुरातील वोकहार्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. परंतु प्रकृती बिघडल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नवनीत राणा यांना रस्तेमार्गे रुग्णवाहिकेतून मुंबईला आणले.

लीलावतीमध्ये दाखल केले त्यावेळी श्वासोच्छवास करताना त्रास आणि छातीदुखी होत असल्याची तक्रार नवनीत राणा यांनी केली होती. त्यामुळे नवनीत राणा यांच्या प्रकृतीबाबत कुटुंबासह कार्यकर्त्यांनी चिंता व्यक्त केली होती. परंतु नवनीत राणा यांनी व्हिडीओ शेअर केल्याने सर्वांनाच काहीसा दिलासा मिळाला आहे.

नवनीत कौर राणा यांचा कोरोना चाचणी अहवाल 6 ऑगस्टला पॉझिटिव्ह आला होता. नवनीत राणा यांच्यासह पती- आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासरे असे कुटुंबातील 12 जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवर नागपूरच्या वोकहार्ट रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

संबंधित बातम्या :

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल

खासदार नवनीत कौर राणा यांना कोरोनाची लागण

(Corona Positive Amravati MP Navneet Ravi Rana Health Stable shares video from Lilavati Hospital)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *