AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | “पवार साहेबांना म्हटलं मी थांबतो, ते म्हणाले निवडणूक तूच लढवणार, अजितलाही सांगू नकोस” दत्ता भरणेंचा गौप्यस्फोट

"विधानसभा निवडणूक लागली तेव्हा मी शरद पवारांकडे गेलो, माझ्यामुळे जर पक्ष अडचणीत येत असेल तर मी थांबायला तयार आहे, असं सांगितलं होतं. मात्र निवडणूक तुला लढवायची आहे, हे तू अजितशी सुद्धा बोलायचं नाही, असं त्यांनी सांगितलं." असं दत्ता भरणे म्हणाले

VIDEO | पवार साहेबांना म्हटलं मी थांबतो, ते म्हणाले निवडणूक तूच लढवणार, अजितलाही सांगू नकोस दत्ता भरणेंचा गौप्यस्फोट
शरद पवार, दत्ता भरणे, अजित पवार
| Edited By: | Updated on: Jul 25, 2021 | 2:56 PM
Share

पुणे : “2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीत बिघाडी होऊ नये, म्हणून मी माघार घ्यायला तयार होतो, मी हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाही सांगितलं होतं, मात्र 2019 ची निवडणूक ही तुलाच लढवायची आहे, हे मला शरद पवारांनीच सांगितलं आणि हे अजित पवार (Ajit Pawar) यांनाही सांगू नका” असंही त्यांनी सांगितल्याचा गौप्यस्फोट राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांनी केला आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील (Harshavardhan Patil) यांच्या राजकारणाला शरद पवारांनीच खिळ घातली का? अशी चर्चा रंगली आहे. इंदापूरच्या जागेविषयी भरणे पुण्यात आयोजित राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात बोलत होते.

जाएंट किलर दत्ता भरणे

दत्ता भरणे हे पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार आहेत. काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार आणि चार वेळा आमदार हर्षवर्धन पाटील यांचा पराभव करुन 2014 मध्ये दत्ता भरणे यांनी राष्ट्रवादीतर्फे जागा जिंकली होती. त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीसह चारही प्रमुख पक्ष स्वतंत्रपणे विधानसभा निवडणूक लढले होते. पाटलांना हरवून भरणे जाएंट किलर ठरले होते.

2019 च्या विधानसभेआधी काँग्रेस-राष्ट्रवादीने निवडणूकपूर्व आघाडी केली होती. त्याचवेळी हर्षवर्धन पाटलांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केला होता. भाजपच्या तिकीटावर ते इंदापुरातून मैदानात उतरले. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत दत्ता भरणे यांनी आपली जागा राखत हर्षवर्धन पाटलांना धोबीपछाड दिली. त्यानंतर भरणेंना ठाकरे सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग, मृदा आणि जलसंधारण विभागाचे राज्यमंत्रिपद त्यांना देण्यात आले.

दत्ता भरणे काय म्हणाले?

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाला भेट देऊन ऊर्जा मिळाली. शरद पवार हे कार्यकर्त्यांचं मन जाणणारे आहेत. इथे कार्यकर्त्यांना न्याय मिळतो. कार्यकर्त्यांनी चांगलं वातावरण निर्माण केलं आहे. मी शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे, कारखान्याचा संचालक होईन, असं वाटलंही नव्हतं. मात्र साडेबाविसाव्या वर्षी पवारांनी संचालक म्हणून काम करण्याची संधी दिली. 1996 मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक चेअरमन, छत्रपती साखर कारखाना” अशी यादी भरणे वाचून दाखवत होते.

“2009 ला पक्षासोबत बंडखोरी केली आणि मी बाजूला झालो. थोड्या मताने माझा पराभव झाला. 2012 ला पवार साहेबांनी देशाच्या कमिटीवर घेतलं. पवारांनी जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं. काम करायचं ठरवलं. 2014 ते 2019 ला जास्त निधी आणला. 1305 कोटी रुपयांचा निधी आणला” असंही दत्ता भरणेंनी सांगितलं.

“…तर मी थांबायला तयार आहे”

“विधानसभा निवडणूक लागली तेव्हा मी शरद पवारांकडे गेलो, माझ्यामुळे जर पक्ष अडचणीत येत असेल तर मी थांबायला तयार आहे, असं सांगितलं होतं. मात्र निवडणूक तुला लढवायची आहे, हे तू अजितशी सुद्धा बोलायचं नाही, असं त्यांनी सांगितलं. पवार कुटुंब पारखी आहे, सगळ्यांना न्याय मिळेल” असं भरणे म्हणाले.

“शरद पवारांना अपेक्षा आहे. तुम्हाला जर अजित पवारांना भेट द्यायची असेल तर पुण्यात राष्ट्रवादीचा महापौर करा, ही खरी भेट असेल. मी सुद्धा पुण्यात राहतो मीही सहकार्य करेन” अशी ग्वाही दत्ता भरणे यांनी दिली.

“चांगली माणसं आपल्या पक्षात येत आहेत”

“मी कॅबिनेट करायला तयार आहे, मात्र अडचणी येतील म्हणून पीडब्लूडी हे खातं दिलं, हे मन जाणणारे पवार आहेत. पक्षाला खूप भविष्य आहे. चांगली माणसं आपल्या पक्षात येत आहेत, मी हे ऐकलंय, आपलंच घोडं पुढे रेटायचं नाही, माघार घेतली की विचार केला जातो. मंत्री झाल्यापासून अनेक अडचणी आल्या, काम करताना उत्साह वाटला नाही. आज ती माणसं नाहीत मात्र शासन आपल्या पाठीशी आहे. जसं सरकार आलं तशा अडचणी आल्या. मात्र महाविकास आघाडीत, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाळासाहेब थोरात चांगलं काम करत आहेत. महाडला आता राष्ट्रवादी काँग्रेस अँम्बुलन्स, औषध गोळ्या घेऊन निघाले आहेत” अशी माहिती दत्ता भरणे यांनी दिली.

पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या :

नाना पटोलेंचा बॉम्ब, इंदापुरात जाऊन मंत्री दत्ता भरणे आणि अजित पवारांचं टेन्शन वाढवलं!

साहेब-दादांच्या सभेला वडील नेहमी यायचे, मी मंत्री असताना मात्र हयात नाहीत, अजितदादांसमोर दत्ता भरणे भावूक

(Dattatray Bharne shares Secret with Sharad Pawar about Indapur Vidhansabha Election 2019 hidden from Ajit Pawar at Pune NCP Program)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.