मंत्रिपद हे मिरवण्याची गोष्ट नाही, त्याचा उपयोग सर्वसामान्यांना व्हायला हवा : दत्तात्रय भरणे

राज्यमंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आज इंदापूर दौऱ्यावर होते. (Dattatray Bharne Indapur Full Speech)

मंत्रिपद हे मिरवण्याची गोष्ट नाही, त्याचा उपयोग सर्वसामान्यांना व्हायला हवा : दत्तात्रय भरणे
दत्तात्रय भरणे
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 11:32 PM

पुणे : “मंत्रिपद हे मिरवण्याची गोष्ट नाही. त्याचा उपयोग आपल्या भागातील लोकांना आणि सर्वसामान्य माणसांना किती होतो हा खरा महत्त्वाचा विषय आहे. मी खोटं-नाटं वैगरे अजिबात करणार नाही. जे काही करेल ते प्रामाणिकपणे तुम्हा सर्वसामान्यांसाठी करेल,” असे वक्तव्य राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.  (Dattatray Bharne Indapur Full Speech)

राज्यमंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आज इंदापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी इंदापूर शहरानजीक असणाऱ्या माजी नगराध्यक्ष रत्नाकर मखरे यांच्या भिमाई आश्रमशाळेतील लोक प्रबोधनकार अण्णाभाऊ साठे ग्रंथालयाचे उद्धाटन केले. तसेच गोजाई गार्डन आणि तुळसमाई गार्डन याचेही उद्धाटन भरणेंच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी भाषणादरम्यान दत्तात्रय भरणे यांनी हे वक्तव्य केले.

“मंत्रिपदे हे मिरवण्याची गोष्ट नाही त्याचा उपयोग आपल्या भागातील लोकांना तसेच सर्वसामान्य माणसांना किती होतो? हा खरा महत्त्वाचा विषय आहे. मी खोटं-नाट वैगरे अजिबात करणार नाही. जे काही करेल ते प्रामाणिकपणे तुम्हा सर्वसामान्यांसाठी करेल,” असे दत्तात्रय भरणे म्हणाले.

“मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन”

“तुम्ही सांगितलेली सगळी कामे मी करण्याचा प्रयत्न करेल. पण ती करताना ही सर्व कामे होतीलच असे सांगता येत नाही, कारण यात काही अडचणी असतात. काही मर्यादा असतात. काही कायद्यात बसवावी लागतात. यासाठी जी होणारी कामे आहेत,” असेही दत्तात्रय भरणेंनी सांगितले.

“मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत करेन. जी कामे होणार नाहीत त्यात अडचणी असतील. त्याच मी नम्रपणे सांगेन, असा माझा वेगळा स्वभाव आहे,” असेही दत्तात्रय भरणे म्हणाले.

“प्रस्ताव द्या, 20 लाख मंजूर करतो”

भिमाई आश्रम शाळेतील समोरील मैदानावर पेवर ब्लॉक बसवण्याची मागणी शाळेतील शिक्षक वर्ग कर्मचारी यांनी केली होती. त्यावर भाषणातच भरणे यांनी संस्थाचालक रत्नाकर मखरे आणि प्राचार्य यांना या ठिकाणी पेवर ब्लॉक बसवण्यासाठी किती खर्च होईल असे विचारले. त्यावर प्राचार्यांनी पंधरा लाख रुपये लागतील असे सांगितले. यावर भरणे यांनी प्रस्ताव द्या, 20 लाख रुपये मंजूर करतो, असे सांगितले. त्यानंतर उपस्थितांच्या टाळ्यांच्या गजरात भरणेंच्या या वाक्याचे कौतुक केले. (Dattatray Bharne Indapur Full Speech)

संबंधित बातम्या : 

VIDEO : जब-जब मैं बिखरा हूँ, दुगनी रफ्तार से निखरा हूँ, धनंजय मुंडेंचा शायरीतून इशारा

…तर मी माझी खासदारकी फेकून देतो, संभाजीराजे आक्रमक

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.