AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचे नेते तोंडाला येईल ते बोलतात, चंद्रकांत पाटील बावचळलेत; अजित पवारांचा हल्लाबोल

महाविकासआघाडी सरकार चालवताना काहीवेळा अडचणी येतात. | Ajit Pawar

भाजपचे नेते तोंडाला येईल ते बोलतात, चंद्रकांत पाटील बावचळलेत; अजित पवारांचा हल्लाबोल
चंद्रकांत पाटील आणि अजित पवार
| Updated on: Nov 27, 2020 | 4:47 PM
Share

नांदेड: महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात सध्या भाजपचे नेते तोंडाला येईल ते बोलत असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. भाजपचे नेते कोणाहीबद्दल काहीही बोलतात. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे तर बावचळल्यासारखे बोलत असल्याची टिप्पणीही अजित पवार यांनी केली. (DCM Ajit Pawar slams Chandrakant Patil)

मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार हे शुक्रवारी नांदेडमध्ये आले होते. यावेळी त्यांनी प्रचारसभेत भाजपच्या नेत्यांचा समाचार घेतला. भाजपमधील कार्यकर्ते कुठे जाऊ नयेत, यासाठी सरकार पडेल असे गाजर दाखवण्याचे काम सुरु आहे. तरीदेखील एकनाथ खडसे आणि जयसिंगराव गायकवाड यांच्यासारखे नेते आमच्याकडे आले, असे अजित पवार यांनी सांगितले.

महाविकासआघाडी सरकार चालवताना काहीवेळा अडचणी येतात. पण थोडे मागे-पुढे करुन निर्णय घ्यावे लागतात. राज्याचे हित हेच आमचे समान धोरण आहे. आजवर महाराष्ट्र कधी दिल्लीश्वरांपुढे झुकला नाही, असे अजित पवार यांनी ठणकावून सांगितले.

यावेळी अजित पवार यांनी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत आहेत. माझ्या 30 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत मी असं कधी पाहिलं नव्हतं. तिन्ही पक्षांनी एकत्र बसून जागावाटप केले. त्यामुळे आता व्यक्तिगत हेवेदावे करुन वातावरण गढूळ करु नका. आपल्या पक्षाच्या वरिष्ठांनी घेतलेल्या निर्णयाचे पालन करणे हे कार्यकर्ता म्हणून आपले कर्तव्य असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.

‘केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्गांची कामं रखडली, 28 हजार 700 कोटी जीएसटीही थकबाकी’

यावेळी अजित पवार यांनी केंद्र सरकारकडून राज्यातील महामार्गांच्या कामावर होणाऱ्या दुर्लक्षावरही भाष्य केलं. तसेच राज्याच्या हक्काच्या जीएसटीचाही मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, “केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्गांची कामे रखडली आहेत. केंद्राकडे 28 हजार 700 कोटी बाकी आहे. राज्याचे हे हक्काचे पैसे का दिले नाही? 12 हजार कोटी पगारांवर खर्च होत आहेत. निसर्ग चक्री वादळात मागच्या सरकारपेक्षा जास्त मदत दिली. परतीच्या पावसात मोठे नुकसान झाले. एसटीला देखील आम्ही पॅकेज दिले.”

संबंधित बातम्या:

भाजप गाजर दाखवतंय, तरीही खडसे, जयसिंग गायकवाडांसारखी माणसं आमच्याकडे : अजित पवार

महाविकास आघाडी जिंकल्यास फडणवीस दिल्लीत जातील; अशोक चव्हाण यांचा दावा

(DCM Ajit Pawar slams Chandrakant Patil)

कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....