AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर होताच देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘त्यांचे नाव…’

पंकजा मुंडेंना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर परळीत मुंडे समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समस्त मुंडे समर्थकांनी एकत्र येत पंकजा मुंडे यांच्या नावाने घोषणाबाजी करत हा आनंदोत्सव साजरा केला.

पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर होताच देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्यांचे नाव...'
| Updated on: Jul 01, 2024 | 6:03 PM
Share

Devendra Fadnavis Comment Pankaja Munde : भारतीय जनता पक्षाकडून विधान परिषदेसाठी पाच नेत्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यात भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर दिसत आहेत. त्यापाठोपाठ योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोखले, सदाभाऊ खोत यांची नावे आहेत. भाजपकडे विधान परिषदेत 5 आमदार निवडून येतील इतकं संख्याबळ आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपने परिपत्रक काढत या पाच नेत्यांच्या नावाची घोषणा केली आहे. आता या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा ताईंना विधानपरिषदेत उमेदवारी दिली जावी, असा आमचा आग्रह होता. केंद्रीय भाजपने हा आग्रह मान्य करत त्यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यासाठी आम्ही केंद्रीय भाजपचे आभार मानतो, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते पुण्यात बोलत होते.

“आम्ही केंद्रीय भाजपचे आभार मानतो”

भाजपकडून विधानपरिषदेसाठी पाच नावं जाहीर झाली आहेत, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. विशेषत: आमच्या सर्वांचा आग्रह होता की पंकजा ताईंना विधानपरिषदेत उमेदवारी दिली जावी. केंद्रीय भाजपने हे मान्य केले आहे आणि त्यांचे नाव जाहीर केले आहे. त्यामुळे आम्ही केंद्रीय भाजपचे आभार मानतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

यावेळी देवेंद्र फडणवीसांना राहुल गांधींनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, राहुल गांधींनी केलेले ते विधान अत्यंत चुकीचे, आक्षेपार्ह आणि संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान करणारे आहे. लोकसभेत तमाम हिंदू समाजाला त्यांनी हिंसक म्हणणं हा संपूर्ण हिंदू समाजाचा अपमान आहे. त्यांनी आपले शब्द परत घेतले पाहिजेत. राहुल गांधींनी संपूर्ण हिंदूंची जाहीरपणे माफी मागितली पाहिजे, अशी आमची जाहीर मागणी आहे.

परळीत मुंडे समर्थकांकडून जल्लोष

दरम्यान, पंकजा मुंडेंना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर परळीत मुंडे समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात समस्त मुंडे समर्थकांनी एकत्र येत पंकजा मुंडे यांच्या नावाने घोषणाबाजी करत हा आनंदोत्सव साजरा केला. एकमेकांना पेढे भरवून आणि फटाके फोडत हा जल्लोष साजरा होत आहे. लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला. या पराभवानंतर मुंडे समर्थकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळाला होता. मात्र अखेर भाजपकडून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेत संधी देण्यात आली आहे. याची अधिकृत घोषणा आज करण्यात आली. पंकजा मुंडेंच्या या निवडीनंतर मुंडे समर्थकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या संधी नंतर नेमके जिल्ह्यातील राजकीय समीकरण कसे बदलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.