AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रपती निवडणुकीच्या एनडीए बैठकीला दीपक केसरकर जाणार, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना केसरकर भावूक

केसरकर सध्या त्यांच्या मतदारसंघात आले आहेत. याबाबत केसरकरांना विचारणा केली असता, त्यांनी घडलेला घटनाक्रम सांगितला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्यासाठी मतदारसंघात यायला तयार झाले होते, असे सांगताना केसरकर भावूक झाले. मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना त्यांच्या डोळ्यातच पाणी आले.

राष्ट्रपती निवडणुकीच्या एनडीए बैठकीला दीपक केसरकर जाणार, मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना केसरकर भावूक
दीपक केसरकर भावूकImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jul 12, 2022 | 9:18 PM
Share

मुंबई – राष्ट्रपतीपदाची निवडणूक (President Election)पुढच्या आठवड्यात होणार आहे. एनडीएच्या (NDA)उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना देशात वाढता मिळतो आहे. यशवंत सिन्हा यांचा पराभव करुन त्यांचीच राष्ट्रपतीपदी निवड होण्याची शक्यता आहे. यासाठी एनडीएची बैठक उद्या दिल्लीत बोलावण्यात आली आहे. या बैठकीला शिंदे गटाकडून आमदार दीपक केसरकर (Deepak Keasarkar)जातील अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. केसरकर सध्या त्यांच्या मतदारसंघात आले आहेत. याबाबत केसरकरांना विचारणा केली असता, त्यांनी घडलेला घटनाक्रम सांगितला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्यासाठी मतदारसंघात यायला तयार झाले होते, असे सांगताना केसरकर भावूक झाले. मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना त्यांच्या डोळ्यातच पाणी आले. केसरकर हे बंडखोर आमदारांचे प्रवक्ते आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून आपली भूमिका चांगल्या प्रकारे मांडली आहे.

का भावूक झाले केसरकर ?

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्याला दिल्लीला एनडीएच्या बैठकीला जाण्यासाठी सांगितले, यात त्यांचा मोठेपणा असल्याचे केसरकर यांनी सांगितले. जेव्हा आपण मुंबईतून निघालो आणि १५ तारखेला परत येतो असे मुख्यमंत्र्यांना सांगायला गेलो, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गरज लागली तर मी स्वता तुमच्या मतदारसंघात येईल असे म्हणाले. यावेळी इतका जमिनीवरचा नेता आपला असल्याचे सांगताना केसरकर काही क्षण भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. पहिल्यांदाच केसरकर इतके सद्गदित झाल्याचे पाहाला मिळाले.

उद्धव ठाकरेंच्या निर्णयाबद्दल केले अभिनंदन

उद्धव ठाकरेंनी भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांना दिलेला पाठिंबा हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत केले.बाळासाहेब ज्याप्रमाणे पक्षाच्या पलीकडे जाऊन निर्णय घ्यायचे तसाच एक निर्णय आदरणीय उद्धव साहेबांनी घेतलाय त्याच्याबद्दल मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो.

दीपक केसरकरांना मोठी संधी ?

दीपक केसरकर यांना एनडीएच्या बैठकीला पाठवण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेतल्यामुळे, त्यांना आगामी काळात मोठी संधी मिळेल असे मानण्यात येते आहे. बंडाच्या काळात एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे शिंदे गटाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी दिली होती. त्यांनी गुवाहाटीतून त्यावेळी समर्थपणे शिंदे आणि समर्थक आमदारांची बाजू सगळ्याच भाषांमध्ये मांडली. विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पावर यांनीही त्यांच्या या कामगिरीचे कौतुक केले होते. त्यामुळे आगामी काळात केसरकारांना केंद्रात संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. शिंदे गटाला केंद्रात दोन मंत्रिपदेही मिळण्याची शक्यता आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.