Eknath Shinde: संजय राऊत जेवढं कमी बोलतील तेवढं चांगलं आहे, दीपक केसरकरांच्या टार्गेटवर पुन्हा राऊत

एकनाथ शिंदे गटातील आमदारांचा उद्देश आणि ध्येय हे ठरलेले आहे. त्यामुळे येथे कोणी मंत्रीपदासाठी किंवा सत्तेसाठी आलेला नाही. मात्र, मंत्रीपदाबाबत वावड्या उठवून येथील आमदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न हा राऊतांकडून केला जात आहे.

Eknath Shinde: संजय राऊत जेवढं कमी बोलतील तेवढं चांगलं आहे, दीपक केसरकरांच्या टार्गेटवर पुन्हा राऊत
दीपक केसरकर आणि संजय राऊत
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 1:31 PM

मुंबई : (Eknath Shinde) शिंदे गट आणि (Shivsena) शिवसेना यांच्यामधील अंतर हे केवळ संजय राऊत यांची विधाने जबाबदार आहेत. त्यामुळे केसरकर यांच्या प्रत्येक प्रतिक्रयेत त्यांनी या सर्व गोष्टीला संजय राऊत यांनाच जबाबदार धरलेले आहे. आता पक्ष प्रमुख (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतरही त्यांच्याबद्दल प्रत्येक आमदाराच्या मनात आदराचीच भावना आहे पण (Sanjay Raut) संजय राऊत हे जेवढं कमी बोलतील तेवढं पक्षासाठी फायद्याचे राहणार असल्याचे म्हणत या सर्व प्रकरणात राऊत हे टिकेचे धनी ठरत आहेत. केवळ दीपक केसरकरच नाहीतर सोशल मिडियावर देखील राऊतांनी केलेल्या विधानांचा नेटकऱ्यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

आमदारांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न

एकनाथ शिंदे गटातील आमदारांचा उद्देश आणि ध्येय हे ठरलेले आहे. त्यामुळे येथे कोणी मंत्रीपदासाठी किंवा सत्तेसाठी आलेला नाही. मात्र, मंत्रीपदाबाबत वावड्या उठवून येथील आमदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न हा राऊतांकडून केला जात आहे. आमदारांच्यान मनात कोणताही भेदभाव नाहीतर एकनाथ शिंदे जो ठरवतील तो फॉर्म्युला सर्वांना मान्य असल्याचे केसरकर यांनी सांगितले. संजय राऊत यांच्याकडून पक्षाचे तर नुकसान झाले आहेच पण आता या आमदारांमध्येदेखील ते मंत्री पदावरुन संभ्रम निर्माण करु इच्छित असल्याचे केसरकर म्हणाले आहेत.

बंडखोराच्या निर्णयापासून राऊत आक्रमकच

शिवसेना पक्षातील आमदारांनी बंड पुकारल्यापासून संजय राऊत यांनी त्यांच्याबाबत आक्रमक भूमिका ही घेतलेली आहे. शिवाय दीपक केसरकर यांनी वारंवर आवाहन करुन देखील राऊतांनी आपला ठाकरी बाणा कायम ठेवला होता. त्यामुळे शिंदे गट आणि पक्ष प्रमुख यांच्यातील अंतर वाढत गेल्याचे केसरकर यांनी सांगितले. एवढेच नाहीतर असे प्रवक्ते पक्षाला मिळाल्यावर दुसरे काय होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा

आनंद नव्हे उलट दु:खच

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी आनंदोत्सव साजरा केला अशा वावड्या सोशल मिडियावर उठल्या होत्या. पण आजही उद्धव ठाकरे यांच्या बद्दल प्रत्येक आमदाराच्या मनात आदर हा कायम आहे. शिवाय ते एक कुटुंबप्रमुख राहिलेले आहेत. अनेक वेळा आवाहन करुनही त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला नसल्याने ही वेळ आल्याचे केसरकर यांनी सांगितले. शिवाय त्यांना पायउतार व्हावा लागल्याने कुणालाही आनंद झाला नाही असेही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत
तर तुतारी वाजवून टाका, राणांच्या विधानानंतर सुजय विखेंच वक्तव्य चर्चेत.
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.