AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deepali Sayed : तुम्ही सीएमना भोगी म्हणता, लुच्चा म्हणता, कुणी सुरुवात केली? दिपाली सय्यद म्हणतात, उमा खापरेंनी स्वत:च्या घरात बघावं

'तुम्ही जे बोलता ते सगळं शुद्ध, पवित्र... तुम्ही बोलता ते ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांकडे बोट करायचं. तुम्ही काय माझ्या घरात घुसणार आहात? तेवढी तुमची ताकद आहे का बघा', असा खोचक टोला सय्यद यांनी भाजपला लगावलाय.

Deepali Sayed : तुम्ही सीएमना भोगी म्हणता, लुच्चा म्हणता, कुणी सुरुवात केली? दिपाली सय्यद म्हणतात, उमा खापरेंनी स्वत:च्या घरात बघावं
दीपाली सय्यद, नवनीत राणा, किरीट सोमय्याImage Credit source: TV9
| Updated on: May 30, 2022 | 8:52 PM
Share

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि भाजप नेत्यांवर केलेल्या टीकेनंतर अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद चांगल्याच चर्चेत आहेत. दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांनी दोन दिवसांपूर्वी थेट पंतप्रधान मोदींवरच हल्ला चढवला होता. त्यानंतर आता भाजपच्या महिला नेत्याही आक्रमक झाल्या आहेत. भाजप नेत्या उमा खापरे (Uma Khapare) यांना थेट इशारा दिलाय. यापुढी दीपाली सय्यद यांनी भाजपच्या कोणत्याही नेत्याबद्दल अपशब्द काढला तर आम्ही घरात घुसून त्यांना बदडून काढू, अशा शब्दात खापरे यांनी सय्यद यांना इशारा दिला आहे. खापरे यांच्या या इशाऱ्याला आता दीपाली सय्यद यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘तुम्ही जे बोलता ते सगळं शुद्ध, पवित्र… तुम्ही बोलता ते ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांकडे बोट करायचं. तुम्ही काय माझ्या घरात घुसणार आहात? तेवढी तुमची ताकद आहे का बघा’, असा खोचक टोला सय्यद यांनी भाजपला लगावलाय.

टीव्ही 9 मराठीशी बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या की, ‘जेव्हा तुम्ही हे सगळं बोलता आहात, मग सगळ्यात आधी तुमच्या घरावर मोर्चे काढायला हवेत. तुमच्या घरात घुसलं पाहिजे. तुमच्यासाठी पंतप्रधान हे सर्वोच्च पद आहे, मग आमच्यासाठी मुख्यमंत्री कुणी नाहीत का? तुमच्यासाठीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काही नाहीत का? तुमचे नेते, त्यांच्या बायका येतात, घरात घुसायची भाषा करतात, मुख्यमंत्र्यांना भोगी म्हणतात, लुच्चा म्हणतात. मग सगळ्यात आधी किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील यांच्यावर केसेस दाखल व्हायला हव्यात. त्यांना आतमध्ये टाकायला हवं. तुम्ही माझ्या घरात घुसण्यापूर्वी तुमच्या घरात तुम्ही काय करत आहात ते बघा’.

तुम्ही काय माझ्या घरात घुसणार?

‘कुणी सुरुवात केली, कोण कुणाबरोबर बोलत आहे. पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह बोलणं हे पूर्ण महाराष्ट्र जाणतो, पूर्ण जग जाणतं. पण सुरुवात कुणी केली? हे भाजपचं राजकारण आहे. तुमचेच नेते देवेंद्र फडणवीस म्हणतात, माझी बायको माझं ऐकत नाही. तिला काय वाऱ्यावर सोडलं आहे का? ती बोलते तर तुम्ही खपवून घेताय. ती कुणाबद्दल बोलते? मुख्यमंत्र्यांबाबतच बोलतात. किरिट सोमय्यांनी सर्वात आधी वक्तव्य केलं त्यावर मी बोलले. चंद्रकांत पाटील आधी मसणात जा बोलले आणि नंतर पलटी मारतात. म्हणजे तुम्ही जे बोलता ते सगळं शुद्ध, पवित्र… तुम्ही बोलता ते ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यांकडे बोट करायचं. तुम्ही काय माझ्या घरात घुसणार आहात? तेवढी तुमची ताकद आहे का बघा. केसेस करायची असेल तर आधी तुमच्या नेत्यांवर करा. माझ्यावर केस केली तर तुमचे दोन नेते आतमध्ये घेऊन जाईन. सेनाभवन तुम्ही हलक्यात घेत आहात, मुख्यमंत्र्यांना हलक्यात घेत आहात. पण शिवसैनिक गप्प बसणार नाही. किरीट सोमय्या, चंद्रकांत पाटील, अमृता फडणवीस ज्या पद्धतीने बोलतात ते तुम्ही खपवून घेता’, असा पलटवारही सय्यद यांनी भाजपवर केलाय.

‘सरकार आणायचं आहे तर विकासाबाबत बोला’

भाजप नेत्या उमा खापरे यांनी दिलेल्या इशाऱ्याबाबत बोलताना दिपाली सय्यद म्हणाल्या की, कोण उमा खापरे? असे प्रत्येक पोलीस ठाण्यात तुम्ही तक्रार करत बसणार आहात तर अशा पद्धतीने राजकारण नाही चालत, अशाप्रकारे तुम्ही नाही जिंकून येणार. विकासाबाबत बोला, काहीतरी चांगलं काम करा, हे काय सुरु आहे. कुणीही येणार, काहीही बोलणार, किरीट येतो लुच्चा बोलतो. ती येते शनी म्हणते. तुम्हाला तुमचं सरकार आणायचं आहे तर विकासाबाबत काही बोला, काही चांगलं घेऊन या, हे काय… मी बोलले तर तुम्हाला लागलं. तुमच्या घरात काय सुरु आहे, तुमची लोकं कोणती भाषा वापरत आहेत, ते आधी बघा.

असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलेला नाही – सोमय्या

अनिल परब यांच्या दापोलीतील कथित रिसॉर्ट प्रकरणावर बोलताना भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख लुच्चा असा केला होता. “उद्धव ठाकरे यांनी 19 बंगल्यासंबंधी थोतांड नाटक केलं. अनिल परबही त्याच माळेतले मनी आहेत. अहो मुख्यमंत्री किती लबाडी करणार. असा लुच्चा मुख्यमंत्री महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिलेला नाही. मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन अनिल परब मीडियाला गंडवलं असं सांगतात,” असा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.

नवनीत राणांकडून मुख्यमंत्र्यांचा शनी असा उल्लेख

खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दात टीका केली.” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला लागलेला शनी आहे, हे संकट दूर व्हावं म्हणून आम्ही हनुमानाचरणी प्रार्थना करतोय”, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....