AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असा विरोधीपक्ष पाहिलाच नाही, अब्दुल सत्तारांची पाठराखण करताना फडणवीस काय म्हणाले?

  विरोधी पक्षांनी कितीही बॉम्ब बॉम्ब म्हणले तरीही त्यात फार तथ्य नाही, असं वक्तव्य फडणवीस म्हणाले.

असा विरोधीपक्ष पाहिलाच नाही, अब्दुल सत्तारांची पाठराखण करताना फडणवीस काय म्हणाले?
Image Credit source: social media
मंजिरी धर्माधिकारी
मंजिरी धर्माधिकारी | Updated on: Dec 28, 2022 | 12:46 PM
Share

नागपूरः शिंदे सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर मविआ नेत्यांनी टीईटी घोटाळ्याचे आरोप केले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या दोन मुलींना या गैरव्यवहारातून नोकरी लावल्याचे म्हटले जात आहे. आज हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना सत्तार यांची पाठराखण केली. तर विरोधी पक्षावर निशाणाही साधला. स्वतःच्याच काळातील घोटाळ्यांचे आरोप उकरून काढणारा असा पहिलाच विरोधी पक्ष पाहिल्याचं फडणवीस म्हणाले. यानंतर सभागृहात एकच हशा पिकला.

स्वतःच्याच काळातील घोटाळ्यांचे आरोप करणारा असा विरोधीपक्ष मी आजवर कधी पाहिला नाही, असा टोमणा देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

राज्यात टीईटी परीक्षेत झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी आज विधानसभेत विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.

फडणवीस म्हणाले, राज्यातल्या लाखो तरुणांना बुडवणारा घोटाळा मविआ सरकारच्या काळात झाला. यात सनदी अधिकाऱ्यांपासून अनेक लोक घोटाळ्यात लिप्त होते.. मंत्रालयातले अधिकारीही या प्रकरणी अटक झाले. अब्दुल सत्तारांच्या कोणत्याही मुलीला टीईटी अंतर्गत नोकरी लागलेली नाही…

कमिशनरने खुलासा करून त्याचवेळी त्या अपात्र केल्या होत्या. पण सत्तार यांच्यावरील आरोप खोटे आहेत, असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं.  विरोधी पक्षांनी कितीही बॉम्ब बॉम्ब म्हणले तरीही त्यात फार तथ्य नाही, असं वक्तव्य फडणवीस म्हणाले.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी टीईटी परीक्षेअंतर्गत झालेल्या गैरव्यवहारांचा फायदा घेत स्वतःच्या मुलींनाही नोकरी लावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच गायरान जमीन कवडीमोल भावात विकल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. सभागृहात आज या प्रश्नावर चर्चा झाली.

तर गायरान जमीनीबाबतच्या आरोपांनाही अब्दुल सत्तार यांनी आज पहिल्यांदाच विधानसभेत उत्तर दिलं.

उच्च न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांनुसारत जमिनींचं वाटप केल्याचं स्पष्टीकण सत्तार यांनी दिलं. यात कोर्ट जो निर्णय देईल, तो मला मान्य आहे. पण विरोधकांच्या आरोपांना मी जुमानत नाही, असं सत्तार म्हणाले.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच