युती न करता दीडशेपेक्षा अधिक जागा आल्या असत्या, फडणवीसांच्या दाव्यावर शिवसेनेकडून जोरदार चिमटे

युती न करता मिशन दीडेशेपेक्षा अधिक जागा आल्या असता, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीरपणे सांगितले होते (Devendra Fadanvis on Shivsena)

युती न करता दीडशेपेक्षा अधिक जागा आल्या असत्या, फडणवीसांच्या दाव्यावर शिवसेनेकडून जोरदार चिमटे

मुंबई : “युती न करता मिशन दीडेशेपेक्षा अधिक जागा आल्या असता”, असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच जाहीरपणे सांगितले होते (Devendra Fadanvis on Shivsena). फडणवीसांच्या या वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. त्यासोबत शिवसेनेनेही फडणवीसांच्या वक्तव्यानंतर फडणवीसांना जोरदार चिमटे काढले आहेत.

105 आमदार आल्यावरही विरोधी पक्षात बसावं लागलं असल्याची खंत फडणवीसांच्या बोलण्यातून पुन्हा एकदा समोर आली आहे.

युती केली नसती तर मिशन दीडशेपेक्षा अधिक जागा आल्या असत्या, असं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितले.

खरं तर आमचं ठरलंय, आमचं ठरलंय म्हणत तिकिट वाटप झाल्यावरही जागा वाटपाचा फॉर्म्युला भाजपनं जाहीर केला नाही. निकालानंतर आमचं ठरलंय म्हणणाऱ्या भाजपनं, शिवसेनेच्या अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाबाबत ठरलंच नसल्याचं सांगितलं आणि बहुमत मिळालेल्या युतीची माती झाली.

अजितदादांशी शेकहँड करुन केलेला पहाटेचा शपथविधीही फक्त 3 दिवसांपुरताच टिकला. कारण सुप्रीम कोर्टानं गुप्त मतदान न करता, लाईव्ह प्रक्षेपणात बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देताच फडणवीसांना राजीनामा द्यावा लागला होता.

राजकारणात संख्याबळाला महत्व आहे. युती न करण्याची घोषणा तर उद्धव ठाकरेंनी केली होती. पण लोकसभेत मोदी लाटेत भाजपसोबत युतीकरुन शिवसेनेनं 18 खासदार निवडून आले. विधानसभा निकालानंतर युती तुटल्यावरही मुख्यमंत्रिपदी खुद्द शिवसेनेचे पक्षप्रमुखच विराजमान झाले. मात्र असंच पॉलिटिकली करेक्ट राहणं फडणवीसांना न जमल्यानं, मनातलं आता ओठावर येत असल्याचं बोललं जात आहे.

संबंधित बातम्या :

लॉटरी लागून सत्तेत, आता ठाकरे सरकार महाराष्ट्राला जुगाराचा अड्डा करणार का?, भाजपचा सवाल

युती केली ही एकच गोष्ट चुकली, नाही तर विधानसभा निवडणुकीत 150 च्या पुढे गेलो असतो : देवेंद्र फडणवीस

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *