AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनोमुळं दोन दिवसांचं अधिवेशन, जिल्हा परिषद निवडणुकांना कोणता डेल्टा ना कोणता व्हायरस, फडणवीस आक्रमक

देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे विधिमंडळ अधिवेशन, ओबीसी राजकीय आरक्षण आणि विधानसभा अध्यक्ष निवडणूक यासंदर्भात मागण्या केल्याचं सांगितलं. Devendra Fadanvis

कोरोनोमुळं दोन दिवसांचं अधिवेशन, जिल्हा परिषद निवडणुकांना कोणता डेल्टा ना कोणता व्हायरस, फडणवीस आक्रमक
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
| Edited By: | Updated on: Jun 23, 2021 | 5:37 PM
Share

मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजासंदर्भात आक्षेप नोदंवण्यासाठी भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. भाजपच्या शिष्टमंडळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह इतर भाजप नेते होते. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे विधिमंडळ अधिवेशन, ओबीसी राजकीय आरक्षण आणि विधानसभा अध्यक्ष निवडणूक यासंदर्भात मागण्या केल्याचं सांगितलं. दोन दिवसांच्या अधिवेशनाच्या निर्णयावरुन देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.(Devendra Fadanvis slam Mahavikas Aaghadi Government over various issues in state)

जिल्हा परिषद निवडणुकांना डेल्टा वायरस नाही का?

आम्ही आज राज्यपालांची भेट घेतली. राज्य सरकार अधिवेशनापासून पळ काढत आहे. सरकारी पक्षाचे कार्यक्रम होतात, पण कोरोनाचे कारण सांगून अधिवेशन मात्र दोन दिवसांचं घेतलं जातंय. अधिवेशन दोन दिवसांचं आणि जिल्हा परिषद निवडणुका मात्र होतात, त्याला कोणता डेल्टा नाही ना कोणता व्हायरस, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी केला. सरकारमधील घोटाळे बाहेर येत आहेत. महाराष्ट्रात विद्यार्थी, महिला, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण याचा आक्रोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे अधिवेशनापासून पळ काढला जात आहे, जास्त दिवसांचं अधिवेशन घेण्याची मागणी आम्ही केली. जास्तीत जास्त दिवसाचं अधिवेशन घ्यायला लावावं, अशी मागणी राज्यपालांकडे केल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

विधानसभा अध्यक्षपद रिकामं ठेवणं संविधानाचं अवमूल्यन

विधानसभा अध्यक्षांचं पद रिक्त ठेवता येत नाही. अध्यक्षपद रिक्त झाल्यानंतर ते तसंच ठेवता येत नाही, असं संविधान सांगत. मात्र, तरीही विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली जात नाही. अध्यक्षपद रिक्त ठेवण हे संविधानाचं अवमुल्यन करण्यासारखं आहे. महाराष्ट्रात संविधानिक कारभार होत नाही हे तुम्ही राष्ट्रपतींना कळवा, अशी मागणी केल्याचंही फडणवीस म्हणाले.

सरकारच्या नाकर्तेपणामुळं आरक्षण गेलं

ओबीसी आरक्षण सरकारच्या नाकर्तेपणामुळ गेलं आहे. 40-50 वर्षात पहिल्यांदा ओबीसींना राजकीय आरक्षण या सरकारने ठेवलं नाही. आरक्षणाचा मार्ग निघेपर्यंत निवडणुका घेऊ नका असं सरकारने सांगितलं होतं. पण त्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्यापालांना विनंती केली आहे की या निवडणुका पुढे ढकला. राज्य सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला आहे..

माझं आव्हान आहे, ओबीसीचे मंत्र्यांना आव्हान, राज्य सरकारला अधिकार आहे, या मंत्र्यांनी राज्य सरकारला निवडणुका पुढे घ्यायला भाग पाडाव, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आम्ही आंदोलन करणार आहोतच, निवडणुका जर घेणार असाल तरीही भाजप या जागांवर केवळ ओबीसी उमेदवार देईल.. निवडणूक जिंकलो हरलो काहीही होवो, ओबीसींच्या आरक्षणासाठी भाजप पाठपुरावा करेल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

किती जिल्हा परिषद जागांसाठी मतदान होतंय?

धुळे – 15 नंदूरबार – 11 अकोला – 14 वाशिम -14 नागपूर -16

नेमक्या किती पंचायत समिती जागांसाठी मतदान? धुळे -30 नंदूरबार -14 अकोला -28 वाशिम -27 नागपूर -31

संबंधित बातम्या:

ओबीसी राजकारणावर भाजपकडून सत्ताधारी चेकमेट, ‘त्या’ जागांवर फक्त ओबीसी उमेदवार देण्याचीच फडणवीसांची घोषणा

‘सामान्य माणसाचे डोळे उंदीर कुरतडतोय, तर शिवसेनेनं मुंबई महापालिकेलाच कुरतडलं’, आशिष शेलारांचा घणाघात

(Devendra Fadanvis slam Mahavikas Aaghadi Government over various issues in state)

पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.