AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेबांना अभिवादन करायला लाज वाटते त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसता? एवढी लाचारी? फडणवीसांचा हल्लाबोल!

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्यांना अभिवादन करणारं साधं ट्विटही केलं नाही. आधी त्यांच्याकडून ट्विट करून दाखवा. ते ट्विटही करत नाहीत. तरीही तुम्ही त्यांच्या मांडिला मांडी लावून बसत आहात. किती लाचार आहात तुम्ही, असी टीका फडणवीस यांनी केली.

बाळासाहेबांना अभिवादन करायला लाज वाटते त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसता? एवढी लाचारी? फडणवीसांचा हल्लाबोल!
पंडितजींनी कार्यकर्त्यांची फळी उभी केली-फडवीस
| Edited By: | Updated on: Jan 24, 2022 | 1:33 PM
Share

मुंबईः 25 वर्ष आम्ही भाजपसोबत युतीत सडलो, असे आरोप करणाऱ्या शिवसेनेला भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी चांगलंच फैलावर घेतलं. 2012 पर्यंत बाळासाहेब ठाकरे युतीचे नेते होते. त्यांच्या युतीच्या निर्णयावर तुम्ही बोट ठेवताय का, बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवलं, असं तुमचं म्हणणं आहे का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच काल 23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती होती. त्यानिमित्त जवळपास सर्वच भाजप नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना ट्विटद्वारे किंवा प्रत्यक्षपणे आदरांजली वाहिली. पण काँग्रेसकडून असं ट्वीट कधी झालंय का, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मोदींपासून शहापर्यंत आणि फडणवीसांपर्यंत सर्वांनी बाळासाहेबांना ट्विटरवरून अभिवादन केलं. पण सोनिया गांधी, प्रियंका आणि राहुलने अभिवादनाचं ट्विट केलं नाही. आघाडीत असूनही त्यांनी अभिवादन केलं नाही, हे लक्षात आणून देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही बाळासाहेबांबद्दल नेहमी बोलतो त्यांना अभिवादन करतो. आमच्यासाठी ते वंदनीय आहेत. मात्र, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी त्यांना अभिवादन करणारं साधं ट्विटही केलं नाही. आधी त्यांच्याकडून ट्विट करून दाखवा. ते ट्विटही करत नाहीत. तरीही तुम्ही त्यांच्या मांडिला मांडी लावून बसत आहात. किती लाचार आहात तुम्ही. ज्यांना बाळासाहेबांना अभिवानद करायला लाज वाटते, त्यांच्यासोबत तुम्ही आहात अन् वर आम्हाला ज्ञान पाजळता?, अशी टीकाही त्यांनी केली.

भाजपची युती सोडल्यावर तुम्ही चौथ्या क्रमांकावर- फडणवीस

फडणवीस पुढे म्हणाले, ‘ भाजपसोबत लढलो असं सांगताना हे भाजपसोबत असताना पहिल्या क्रमांकावर गेले. भाजपला सोडल्यावर चौथ्या क्रमांकावर गेले याचा निर्णयही त्यांनी केला पाहिजे. कुणाकडे सडले. तेच तेच मुद्दे असतात. कदाचित शिवसैनिकांनाही तेच तेच भाषण पाठ झालं. राम जन्मभूमीच्या आंदोलनात कोण होते तुमचे?. लाठ्याकाठ्या आम्ही खाल्ल्या. तुम्ही तोंडाची वाफ दडवली. कोण होते तुम्ही? राम मंदिर-बाबरी सोडून द्या. मोदींनी करून दाखवलं. त्यांच्या नेतृत्वात तयार होत आहे राम मंदिर. तुम्ही साधा दुर्गाडी किल्ल्याचा आणि मलंगगडाचा प्रश्न सोडवला नाही, असे घणाघात भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.

इतर बातम्या-

Aditya Narayan : गायक आदित्य नारायणच्या घरी ‘कुणीतरी येणार गं…’, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती

IOCL Recruitment 2022 : इंडियन ऑईलमध्ये अप्रेटिंसची सुवर्णसंधी, 570 जागांसाठी अर्ज करण्याचं आवाहन

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.