Shivsena Vs Eknath Shinde: शिवसेना कुणाची? आपल्यासोबत आहे तीच खरी शिवसेना असल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा दावा
महाराष्ट्रात नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले असून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उप मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. मात्र, खरी शिवसेना कुणाची यावरुन एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात वाद सुरु आहे. कोर्टापाठोपाठ हे प्रकरण सध्या केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहचल आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थन करणारे वक्तव्य केले आहे. राज्यात आपल्यासोबत आहे तीच खरी शिवसेना असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हे परिवर्तन सत्तेसाठी नव्हे विचारांसाठी झाल्याचेही फडणवीस म्हणाले.

मुंबई : एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या बंडामुळे महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला. उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. यानंतर महाराष्ट्रात नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. एकनाथ शिंदे यांनी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता शिवसेना कुणाची यावरुन नवा राजकीय वाद रंगला आहे. खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. तर संजय राऊत, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि उद्धव ठाकरे खरी शिवसेना आमची असल्याचं म्हणतं आहे. यामुळे खरी शिवसेना(Shiv Sena) कुणाची यावरुन सुरु असलेला वाद थेट कोर्टात पोहचला आहे. अशातच या वादात आता उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उडी घेतली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे असल्याचे समर्थन करणारे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
महाराष्ट्रात नवे शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले असून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर देवेंद्र फडणवीस यांनी उप मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. मात्र, खरी शिवसेना कुणाची यावरुन एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात वाद सुरु आहे. कोर्टापाठोपाठ हे प्रकरण सध्या केंद्रीय निवडणूक आयोगापर्यंत पोहचल आहे. अशातच देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचे समर्थन करणारे वक्तव्य केले आहे. राज्यात आपल्यासोबत आहे तीच खरी शिवसेना असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. हे परिवर्तन सत्तेसाठी नव्हे विचारांसाठी झाल्याचेही फडणवीस म्हणाले.
शिंदे गट आणि शिवसेनेने कोर्टापाठोपाठ केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागीतलेय दाद
महाराष्ट्रात सध्या जे सरकार स्थापन झालं आहे ते बेकायदेशीर असल्याचं आव्हान शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलं आहे. यावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. त्याचबरोबर आता शिंदे गट आणि शिवसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागण्यात आली आहे. याबाबत खरी शिवसेना कुणाची याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही गटांकडे कागदपत्रे मागण्यात आली आहे. पुढच्या महिन्यात दिलेल्या तारखेच्या आगोदर कागदपत्रे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे कागदपत्रे सादर केल्यानंतर केंद्रीय निवडणुक आयोग त्यावर नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आम्ही शिवसेनाच आहोत – शिंदे गटाचा दावा
आम्ही शिवसेनाच आहोत. आम्ही शिंदे नावाचा दुसरा गट स्थापन केला नाही. गट स्थापन करून दुसरीकडे कुठे आम्ही जाणार नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा विचार घेवून पुढे जातोय. मातोश्री शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) हायजॅक करावा, अशी कुठलीही आमची भूमिका नसल्याचं बंडखोर एकनाथ शिंदे गटाचे म्हणणे आहे.
शिंदे गटाचा पाठिंबा बाढतोय
शिंदे गटाला मिळणाऱ्या पाठिंब्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आमदारांपाठोपाठ नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोबिंवली, अंबरनाथ, उल्हासनगर, मीरा भाईंदर येथील अनेक नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यानंतर शिवसेनेच्या 12 खासदारांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. यामुळे शिंदे गटाकडे शिवसेना पदाधिकाऱ्यांची संख्या वाढत आहे.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा बैठका आणि भेटी गाठींवर जोर
शिंदे गटाला पाठिंबा वाढत असतानाच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा बैठका आणि भेटी गाठींवर जोर दिला. पक्ष संघटनेसाठी आदित्य ठाकरे अनेक ठिकाणचे दौरे करत आहेत.