माजी मंत्री शोभाताई फडणवीसांना पुत्रशोक, देवेंद्र फडणवीसांच्या चुलत भावाचे हार्ट अटॅकने निधन

अभिजीत माधवराव फडणवीस हे जगदंबा राईस मिलचे भागीदार होते. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांचे ते एकुलते एक सुपुत्र, तर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू होते.

माजी मंत्री शोभाताई फडणवीसांना पुत्रशोक, देवेंद्र फडणवीसांच्या चुलत भावाचे हार्ट अटॅकने निधन
Shobha Fadnavis, Abhijeet Fadnavis, Devendra Fadnavis

नागपूर : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू अभिजीत फडणवीस यांचे हार्ट अटॅकने निधन झाले. नागपुरात वयाच्या 54 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिजीत फडणवीस हे माजी मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांचे एकुलते एक सुपुत्र होते.

नागपुरात हृदय विकाराचा झटका

अभिजीत माधवराव फडणवीस यांचे आज (25 ऑगस्ट) रोजी सकाळी 9.30 वाजता निधन झाले. सध्या नागपुरात वास्तव्याला असलेले अभिजीत काही काळापासून होते आजारी असल्याची माहिती आहे. हृदय विकाराच्या झटक्याने नागपूरमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. नागपुरातच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

माजी मंत्री शोभाताई फडणवीसांचे सुपुत्र

अभिजीत माधवराव फडणवीस हे जगदंबा राईस मिलचे भागीदार होते. भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांचे ते एकुलते एक सुपुत्र, तर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू होते. त्यांच्या पश्चात मातोश्री, पत्नी, पुत्र तन्मय फडणवीस असा परिवार आहे.

संबंधित बातम्या :

‘चाचा विधायक है हमारे’ लशीवरुन टीकेची झोड उठलेला फडणवीसांचा पुतण्या तन्मय आहे कोण?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI