Video: आमदार गायकवाडांची रात्रीची उतरली नसावी, सेना आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याला प्रत्युत्तर दिलंय.

Video: आमदार गायकवाडांची रात्रीची उतरली नसावी, सेना आमदाराच्या वादग्रस्त वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याला प्रत्युत्तर दिलंय. आमदार गायकवाडांची रात्रीची उतरली नसावी म्हणूनच ते असं वक्तव्यं करत आहेत, असा टोला फडणवीसांनी लगावला. यावेळी त्यांनी कोरोनाचा धोका सामान्य माणसांपेक्षा तळीरामांनाच असतो, असं म्हणत टोलेबाजी केली (Devendra Fadnavis criticize Shivsena MLA Sanjay Gaikwad over controversial statement).

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कदाचित रात्रीची उतरली नसेल आणि त्यातच आमदार संजय गायकवाड यांनी ती पत्रकार परिषद घेतली असेल. मला त्यांना एकच विनंती करायची आहे की त्यांनी अशाप्रकारे कोरोनाचे विषाणू माझ्या घशात घालण्याआधी हँड ग्लोव्हज घालावेत आणि नीट मास्क लावावं. कारण मला तर जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे मला कोरोनाच्या विषाणूने फार काही होईल असं मला वाटत नाही. पण असं म्हणतात की सामान्य माणसांपेक्षा जे तळीराम असतात त्यांना कोरोना लवकर होतो. त्यामुळे त्यांना जर असं करायची इच्छ असेल तर त्यांनी हँड ग्लोव्हज आणि मास्क वापरावा.”

यावेळी फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीकेचे बाण सोडले. त्यांनी संजय गायकवाड यांच्यासह नवाब मलिक, नाना पटोले, हसन मुश्रीफ यांच्यावरही जोरदार फटकेबाजी केली. “नवाब मलिकांच्या जावयावर एनसीबीनं कारवाई केल्यामुळे ते केंद्रावर पिसाळल्यासारखे आरोप करतात. हसन मुश्रीफ काही माधुरी दिक्षीत किंवा ट्रम्प नाहीत त्यांना महाराष्ट्रबाहेर कुणी ओळखत नाही. पियुष गोयलांवर हसन मुश्रीफांनी टीका करणं चुकीचं आहे,” असंही फडणवीसांनी म्हटलं.

संजय गायकवाड काय म्हणाले होते?

मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं. फडणवीसांनी कोरोनावरुन राजकारण करु नये, असा इशाराही त्यांनी दिला होता.

विरोधी पक्ष यावेळी मदत करायचे सोडून राजकारण करतोय

सध्या राज्यात नव्हे तर संपूर्ण देशभर कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. मात्र मात्र विरोधी पक्ष यावेळी मदत करायचे सोडून राजकारण करत आहे, असा आरोप बुलडाणा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. तसेच यावेळी त्यांनी एकेरी भाषेचा वापर करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांचा खरपूस समाचार घेतला.

कोरोना काळात कोणीच राजकारण करु नये

केंद्रातील भाजपने राज्यसरकारला मदत करायचे सोडून बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळला मदत केली आहे. गुजरातला इंजेक्शन मोफत वाटले. तर इंजेक्शन बनवणाऱ्या कंपन्यांना केंद्र सरकारवर टीका केली आहे. कोरोना काळात कोणीच राजकारण करु नये, असा टोला संजय गायकवाडांनी लगावला.

जर का माणसेच जिवंत राहिली नाही तर तुम्हाला मतदान कोण करणार असा प्रश्न तुम्ही सरकारला विचारत आहात. त्याशिवाय तुम्ही तर सरकार पाडायला निघाले आहात. मात्र अगोदर माणसे जिवंत ठेवा, मगच राजकारण करा, असे आवाहनही त्यांनी भाजपला केलं आहे. तसेच कोरोनाचें जंतू जर मला मिळाले असते तर देवेंद्रच्या तोंडात कोंबले असते , अशी टीका ही त्यांनी केली.

हेही वाचा :

VIDEO : मला कोरोनाचे जंतू मिळाले असते तर फडणवीसांच्या तोंडातच कोंबले असते; शिवसेनेच्या आमदाराची जीभ घसरली

पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर; नितेश राणेंचा शिवसेना आमदारावर पलटवार

व्हिडीओ पाहा :

Devendra Fadnavis criticize Shivsena MLA Sanjay Gaikwad over controversial statement

Published On - 1:02 am, Mon, 19 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI