AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अनिल देशमुखांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा; देवेंद्र फडणवीसांची मागणी

अनिल देशमुख यांनी राजीनामा देणं ही राजकीय मागणी राहिली नाही, देशमुखांनी नैतिकतेच्या आधारे तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. (Devendra Fadnavis demands resignation of Home minister Anil Deshmukh)

अनिल देशमुखांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा; देवेंद्र फडणवीसांची मागणी
Devendra Fadnavis
| Updated on: Apr 05, 2021 | 1:13 PM
Share

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा देणं ही राजकीय मागणी राहिली नाही, देशमुखांनी नैतिकतेच्या आधारे तात्काळ मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. ते राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (Devendra Fadnavis demands resignation of Home minister Anil Deshmukh)

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे. उच्च न्यायालयाने देशमुख प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचं आम्ही स्वागत करतो. या आदेशामुळे आता हप्तेवसुलीचा पर्दाफाश होईल. राज्याला काळीमा फासणारा हा जो कारभार मधल्या काळात झाला. त्याचं सत्य सीबीआय चौकशीतून समोर येईल, असं फडणवीस यांनी सांगितलं.

कोर्टाचं जोरदार उत्तर

या प्रकरणाची सीबीआय चौकशी होऊ नये यासाठी अनेकांनी प्रयत्न केला होता. त्याला कोर्टाने जोरदार उत्तर दिलं आहे. कोर्टाने हप्ते वसुलीविरोधात कडक पाऊल उचललं आहे. आम्ही त्याचं स्वागत करतो, असं सांगतानाच पोलीस गृहमंत्र्यांची चौकशी करूच शकत नाही. कारण पोलिसांवर दबाव असल्याचं दिसून येत होतं, असंही ते म्हणाले.

निर्दोष सुटले तर पुन्हा मंत्री व्हावं

अनिल देशमुख यांनी चौकशीला सामोरं जावं. त्यातून सर्व सत्यबाहेर येईल. ते निर्दोष असतील तर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घ्यावं. त्याला आमचा विरोध असणार नाही. परंतु, तूर्तास चौकशी होईपर्यंत तरी त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. कारण आता हे प्रकरण राजकीय राहिले नसून ते सीबीआयकडे गेलं आहे, असंही ते म्हणाले.

पवारच निर्णय घेतील

अनिल देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पवार हे मोठे नेते आहेत. मोठ्या नेत्यांनी नैतिकता पाळणं हे संकेत आहेत. आतापर्यंत राजीनामाची मागणी केली असता कोर्टाने कुठे आदेश दिला असा सवाल केला जात होता. आता कोर्टाने आदेश दिला आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा पवारांकडे आहेत. तेच या विषयावर निर्णय घेतील. पवार साहेब आजारी आहेत, आम्हाला त्यांना त्रास द्यायचा नाही, असं ते म्हणाले.

घराणं आणि पदाचा मान राखा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पदाचा मान राखला पाहिजे. ते ज्या घराण्यातून येतात, त्याचा मान राखत त्यांनी देशमुखांचा राजीनामा घेतला पाहिजे. त्यांनी राजीनामा घेतला नाही तर लोक मुख्यमंत्र्यांकडे संशयाने पाहतील, असंही त्यांनी सांगितलं. (Devendra Fadnavis demands resignation of Home minister Anil Deshmukh)

कोर्टाला अधिकार

सीबीआयही सेंट्रल एजन्सी आहे. राज्य सरकार सीबीआयला राज्यात येण्यापासून मनाई करू शकते. सीबीआयला राज्य सरकारच्या परवानगीची गरज असते. मात्र, कायद्यात काही तरतूदी आहेत. राज्याने सीबीआयला परवानगी नाकारली तरी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाला सीबीआयकडे चौकशीचे आदेश देण्याचा अधिकार आहे, असं त्यांनी सांगितलं. (Devendra Fadnavis demands resignation of Home minister Anil Deshmukh)

संबंधित बातम्या:

अनिल देशमुखप्रकरणात पहिल्यांदाच शरद पवारांचं नाव, अॅड. जयश्री पाटील म्हणाल्या, भलेही तुम्ही मोठे मराठा नेते असाल

अनिल देशमुख ही मोघलाई नाही, खंडणीखोर गृहमंत्री जेलमध्ये जातील, वकील जयश्री पाटील आक्रमक

सुशांतसिंहप्रकरणही सीबीआयकडे, त्याचं काय झालं?; भाई जगतापांचा सवाल

(Devendra Fadnavis demands resignation of Home minister Anil Deshmukh)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.