AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Chavan : अशोक चव्हाण आणि फडणवीसांची गुप्त भेट, चर्चा गुलदस्त्यात; काँग्रेसला खिंडार पडणार?

Ashok Chavan : काँग्रेसला भगदाड पडणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचा एक बडा नेता भाजपच्या संपर्कात असून येत्या काही दिवसात हा नेत्या आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेसचे काही आमदार आणि माजी मंत्रीही भाजपच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे.

Ashok Chavan : अशोक चव्हाण आणि फडणवीसांची गुप्त भेट, चर्चा गुलदस्त्यात; काँग्रेसला खिंडार पडणार?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 02, 2022 | 1:49 PM
Share

मुंबई: काँग्रेसचे (congress) काही आमदार आणि माजी मंत्री भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा जोरदार चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार पडणार असल्याची चर्चा आहे. एकीकडे काँग्रेसला खिंडार पडणार असल्याची चर्चा सुरू असतानाच काल काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) एकमेकांना भेटल्याची माहिती उघड झाली आहे. हे दोन्ही नेते भाजपच्या एका प्रवक्त्याच्या घरी भेटले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंददाराआड चर्चाही झाल्याचं सांगितलं जातं. अशोक चव्हाण हे काँग्रेसमधून बाहेर पडणार असल्याची आधीही चर्चा होती. त्यानंतर आता हे दोन्ही नेते एकमेकांना भेटल्याने या चर्चांना अधिक उधाण आलं आहे.

अशोक चव्हाण हे भाजपचे प्रवक्ते आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले होते. तिथेच काल सायंकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आले होते. दोन्ही नेते एकाचवेळी कुलकर्णी यांच्या घरी पोहोचल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यावेळी चव्हाण आणि फडणवीस यांच्यात बंददाराआड राजकीय चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे गुलदस्त्यात आहे. परंतु, दोन्ही नेते एकमेकांना भेटल्याने चव्हाण काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.

आधीही चर्चा, चव्हाण काय करणार?

या आधीही अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, अशोक चव्हाण यांनी ही चर्चा फेटाळून लावली होती. आपण काँग्रेस सोडणार नसल्याचं चव्हाण यांनी म्हटलं होतं. तर चव्हाण भाजपमध्ये येण्याच्या चर्चांवर भाजपने सोयीस्कर मौन बाळगलं होतं. त्यामुळे चव्हाण हे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या चर्चांना अधिकच उधाण आलं होतं.

अदृश्य हात कोणते?

शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीवेळी अशोक चव्हाणांसह चार ते पाच आमदार उशिराने सभागृहात पोहोचले होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काही अदृश्य हात आमच्या पाठी असल्याचं सूचक विधान केलं होतं. फडणवीसांचं हे विधान आणि चव्हाण यांचं सभागृहात उशिरा पोहोचण्याचा त्यावेळी संबंधही लावला गेला होता.

चिखलीकरांचं आवतन

काँग्रेसमधील गोंधळ आणि महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून जावं लागल्यानंतर भाजप नेते प्रताप पाटील चिखलीकर यांनी अशोक चव्हाण यांना भाजपमध्ये येण्याचं आवतन दिलं होतं. त्यावरही अनेक तर्कवितर्क लढवले गेले होते.

काँग्रेसला भगदाड पडणार?

दरम्यान, काँग्रेसला भगदाड पडणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचा एक बडा नेता भाजपच्या संपर्कात असून येत्या काही दिवसात हा नेत्या आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेसचे काही आमदार आणि माजी मंत्रीही भाजपच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेपाठोपाठ आता काँग्रेसला मोठं खिंडार पडणार असल्याचं सांगितलं जात आहे.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....