AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अधिकाऱ्यांमधील समन्वयाचं काम राजकीय नेतृत्त्वाचं, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंकडे बोट

मंत्री आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यात समन्वय घडवण्याचं काम राजकीय नेतृत्वाचे असतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले (Devendra Fadnavis on Thackeray government leadership).

अधिकाऱ्यांमधील समन्वयाचं काम राजकीय नेतृत्त्वाचं, फडणवीसांचं उद्धव ठाकरेंकडे बोट
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 07, 2020 | 6:29 PM
Share

मुंबई : “मंत्री आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यात समन्वय घडवण्याचं काम राजकीय नेतृत्वाचं असतं (Devendra Fadnavis on Thackeray government leadership). महत्त्वाचे निर्णय घेताना राजकीय नेतृत्व दिसलं पाहिजे. प्रशासनातील अधिकारी आणि मंत्री यांच्यात समन्वय घडत नाही. तो घडवला पाहिजे, ही माझी मागणी आहे”, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाकडे बोट दाखवलं आहे (Devendra Fadnavis on Thackeray government leadership).

प्रशासनातील अधिकारी आणि मंत्री यांच्यात समन्वय साधला जात नसल्याचं समोर आलं आहे. काही मंत्र्यांनी काल (6 मे) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांची तक्रार केली. समन्वयाचा अभाव, परस्परविरोधी निर्णय यांबद्दल मंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याच गोष्टीचा धागा पकडत देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या नेतृत्वावर भाष्य केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (7 मे) सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

“मुंबईची परिस्थती गंभीर आहे. ही परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची शंका निर्माण होत आहे. मुंबईकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले राजकारण करु नये. आम्ही राजकारण करत नाहीत. उलट त्यांच्याबरोबर असलेली लोक काय करत आहेत ते पाहावं, काहीही झालं तरी केंद्राकडे बोट दाखवणं योग्य नाही”, असंदेखील उद्धव ठाकरे म्हणाले.

संबंधित बातम्या :

भावना दुखावल्या गेल्या, सर्वांची दिलगिरी, संभाजीराजेंच्या मागणीनंतर फडणवीसांकडून दिलगिरी व्यक्त

अमित ठाकरेंना दिलेला शब्द मुख्यमंत्र्यांनी बारा तासात पाळला

…म्हणून मी मास्क लावला नाही, मंत्रालयातील सर्वपक्षीय बैठकीनंतर राज ठाकरेंचं उत्तर

सरकारच्या कामावर समाधानी आहात का? राज ठाकरे म्हणतात….

परप्रांतिय गेलेत, मराठी तरुणांना संधी आलीय : राज ठाकरे

लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन काय? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?