पराभूत झाल्यावर काय बोलायचं?, जयंत पाटलांची कव्हर फायरिंग सुरू; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात आपलाच विजय होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही ते कळून चुकलं आहे. त्यामुळे पराभूत झाल्यावर काय बोलायचं याची प्रॅक्टिस त्यांनी सुरू केली आहे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. (devendra fadnavis slams jayant patil over graduate constituency election)

पराभूत झाल्यावर काय बोलायचं?, जयंत पाटलांची कव्हर फायरिंग सुरू; देवेंद्र फडणवीस यांचा टोला
Follow us
| Updated on: Nov 25, 2020 | 7:21 PM

पुणे: विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात आपलाच विजय होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही ते कळून चुकलं आहे. त्यामुळे पराभूत झाल्यावर काय बोलायचं याची प्रॅक्टिस त्यांनी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून ते कव्हर फायरिंग करत आहेत, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. (devendra fadnavis slams jayant patil over graduate constituency election)

पुण्यात पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आयोजित मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आघाडी सरकारवर घणाघाती टीकास्त्र सोडलं आहे. पदवीधर मतदारसंघाची नोंदणी चांगली झाली आहे. आपण आर्धी लढाई जिंकलो आहोत. त्यामुळेच जयंत पाटलांनी कव्हर फायरिंग सुरू केली आहे. जयंत पाटील अत्यंत हुशार नेते आहेत. समोर पराभव दिसू लागल्यावर त्यांनी लगेच कव्हर फायरिंग सुरू केली आहे. पराभूत झाल्यावर काय बोलायचं याची प्रॅक्टिसही त्यांनी सुरू केली असल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला.

तर यांना ईव्हीएम आठवते

यावेळी त्यांनी पदवीधर मतदारसंघासाठी बोगस मतदान होणार असल्याच्या विरोधकांच्या टीकेचाही समाचार घेतला. बिहारमध्ये आपण जिंकायला लागलो तर यांना मंगळ ग्रह आठवतो आणि ते हरायला लागले की ईव्हीएम आठवते, असा टोला त्यांनी लगावला. या निवडणुकीत ईव्हीएम मशीन नाहीत. त्यामुळे बोगस मतदान होणार असल्याची बोंब मारायला त्यांनी सुरुवात केली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

सविनय कायदेभंगासाठी तयार राहा

या सरकारच्या काळात प्रत्येकाला त्रास दिला जात आहे. या सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकलं जात आहे. आम्ही सरकारमध्ये होतो. आमच्याविरोधातही सोशल मीडियावरून लिहिलं गेलं. पण आम्ही कुणाला त्रास दिला नाही. कुणाला तुरुंगात टाकलं नाही, असं सांगतानाच आता सविनय कायदेभंग करण्याची वेळ आली आहे. तुम्ही तयार राहा, असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं. अंगावर कितीही केसेस पडल्या तरी चालेल. घाबरू नका. ज्यांना घर नाही, दार नाही. संसार नाही. असा मोदींसारखा नेता आपल्या पाठिशी आहे, त्यामुळे घाबरू नका, असंही ते म्हणाले.

फडणवीस काय म्हणाले?

  • ओबीसीचं आरक्षण घटनेनं दिलेलं आहे. त्याला कुणी हात लावू शकत नाही. आम्ही कुणालाही या आरक्षणाला हात लावू देणार नाही.
  • विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या मुंबै बँकेची चौकशी लावण्यात आली. कितीही चौकश्या लावा, कितीही गुन्हे दाखल करा, आम्ही घाबरणार नाही. सरकार जेव्हा नाकर्ते असते तेव्हा आम्ही प्रश्न विचारणारच. तुम्हाला काय गुन्हे दाखल करायचे ते करा.
  • ज्या लोकांनी आपल्याला विजेचा शॉक दिला. त्या सरकारला निवडणुकीत शॉक द्या. (devendra fadnavis slams jayant patil over graduate constituency election)

संबंधित बातम्या:

पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ‘मविआ’कडून जाती-पातीचं राजकारण : बावनकुळे

देशभरात तरुणांची भाजपला पसंती; पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हाच ट्रेंड दिसेल: दरेकर

(devendra fadnavis slams jayant patil over graduate constituency election)

Non Stop LIVE Update
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.