‘त्या’ वक्तव्याच्या पाठीशी नाही, पण भाजप नारायण राणेंच्या पूर्णपणे पाठिशी, फडणवीसांकडून भूमिका जाहीर

भाजप नेते नारायण राणे यांच्या वक्तव्यावर पडसाद उमटलेले असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. (devendra fadnavis,)

'त्या' वक्तव्याच्या पाठीशी नाही, पण भाजप नारायण राणेंच्या पूर्णपणे पाठिशी, फडणवीसांकडून भूमिका जाहीर
devendra fadnavis
Follow us
| Updated on: Aug 24, 2021 | 1:28 PM

मुंबई: भाजप नेते नारायण राणे यांच्या वक्तव्यावर पडसाद उमटलेले असतानाच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. राणेंच्या त्या वक्तव्याच्या पाठिशी भाजप नसेलही, पण नारायण राणेंच्या पाठी भाजप पूर्णपणे पाठिशी आहे, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केली. (devendra fadnavis slams maha vikas aghadi over Shiv Sena, BJP workers clash)

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन ही भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्रीपदावरील व्यक्तीबाबत बोलणं कोणत्याही चुकीच्या विधानाचं समर्थन केलं जाणार नाही. आम्ही नारायण राणेंच्या विधानाचं समर्थन करत नाही. पण भाजप राणेंच्या पूर्णपणे पाठिशी आहे, असं फडणवीस म्हणाले.

तो दखलपात्र गुन्हा नाहीच

राणेंनी जे वक्तव्य केलं आहे. तो कायदेच्या भाषेत दखलपात्रं गुन्हा नाही. आयुक्त स्वत:ला छत्रपती समजात का? जा त्यांच्या मुसक्या बांधा, त्यांना हजर करा, कोणत्या कायद्याने पोलीस आयुक्तांना अधिकार दिला आहे. तुम्ही जे सेक्शन लावले त्याबाबत पहिली त्यांची जबानी घ्यावी लागेल. त्यांची बाजू ऐकावी लागेल नंतरच कारवाई करावी लागेल, असं फडणवीस म्हणाले.

तर पोलीस आयुक्तालयाबाहेर आंदोलन करू

आमच्या कार्यालयावर दगडफेक केली तर खबरदार. आम्ही हे खपवून घेणार नाही. दगडफेक करणाऱ्यांना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. शिवसैनिक दगडफेक करत आहेत, ते म्हणतात आम्ही उद्धवजींच्या आदेशाने करत आहोत. भाजपच्या कार्यालयावर हल्ला केला तर खबरदार, आम्ही हिंसा करत नाही, पण आमच्या कार्यालयावर हल्ला केला तर आम्ही सहन करणार नाही. आमच्या कार्यालयावर दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर आम्ही त्या त्या पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर जाऊन आंदोलन करु. हे कायद्याचं राज्य आहे, तालिबान नाही, असा इशारा त्यांनी दिला.

दुटप्पी भूमिका चालणार नाही

तुम्ही केंद्रीय मंत्र्यांना निर्लज्ज म्हणता, मंत्र्यांना लाथा घाला म्हणता, चौकीदार चोर है म्हणता त्यावर गुन्हे दाखल का होत नाही? आमच्या कुटुंबा विरोधात, पत्नी विरोधात तुम्ही काय काय म्हणता त्यावर कारवाई होत नाही, ही दुटप्पी भूमिका घेऊन चालणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही

अवैधपणे राणे साहेबांना अटक केली तरी जन आशिर्वाद यात्रा थांबणार नाही. प्रवीण दरेकर, आशिष शेलार, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्त्वात ही यात्रा सुरु राहील. युवासेनेने कार्यक्रम करायचे, त्यांच्यावर कारवाई नाही, आणि आमच्यावर कारवाई.. हरकत नाही. आमची यात्रा थांबणार नाही. पोलिसांच्या भरवश्यावर भाजपला रोखण्याचा प्रयत्न गेल्या 50 वर्षापासून होत आहे. पण आम्ही थांबणारे नाही, थांबणार नाही, कितीही रोखण्याचा प्रयत्न केला तरी आमची वाटचाल सुरूच राहील, असं ते म्हणाले. (devendra fadnavis slams maha vikas aghadi over Shiv Sena, BJP workers clash)

संबंधित बातम्या:

मग त्यावेळेस मुख्यमंत्र्यांवर गुन्हा का दाखल झाला नाही? राणे म्हणतात, मी क्रिमिनल ऑफेन्स केलाच नाही

उद्धव ठाकरे मोदींना ‘चोर’ म्हणाले, मग त्यांचं काय करायचं? पाटलांचा राणे प्रकरणावर प्रती सवाल

राणेंच्या वक्तव्याला तुमचं समर्थन आहे काय?; जयंत पाटलांचा पाटील, फडणवीसांना सवाल

(devendra fadnavis slams maha vikas aghadi over Shiv Sena, BJP workers clash)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.