AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : ‘चार पिढ्यांपासून मुंबईत राहणारे उत्तर भारतीय देखील मुंबईकरच’, देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य

ज्या उत्तर भारतीय नागरिकांच्या तीन ते चार पिढ्या मुंबईत राहत आहेत ते सगळेच मुंबईकर आहेत. या सर्वच उत्तर भारतीय नागरिकांनी महाराष्ट्राची संस्कृती अंगिकारली आहे. असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे.

Devendra Fadnavis : 'चार पिढ्यांपासून मुंबईत राहणारे उत्तर भारतीय देखील मुंबईकरच', देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेतेImage Credit source: TV9
| Updated on: Apr 15, 2022 | 9:01 PM
Share

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election) तोंडावर उत्तर भारतीय मुद्द्यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठे वक्तव्य केलंय. ज्या उत्तर भारतीय नागरिकांच्या (North Indian People) तीन ते चार पिढ्या मुंबईत राहत आहेत ते सगळेच मुंबईकर आहेत. या सर्वच उत्तर भारतीय नागरिकांनी महाराष्ट्राची संस्कृती अंगिकारली आहे. असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे. उत्तर भारतीय संघाने कर्करोगग्रस्त रूग्णांच्या नातेवाईकांसाठी तसेच यात्रेकरूंसाठी उभारलेल्या विश्रामगृहाच्या उद्घाटनप्रसंगी फडणवीस बोलत होते. वांद्रे पूर्व येथे हे नव्याने बांधण्यात आलेल्या बाबू आर एन सिंह गेस्ट हाऊसचे उद्घाटन त्यांनी केले. मुंबईत टाटा कॅन्सर रूग्णालय येथे उपचारासाठी देशभरातून येणाऱ्या कर्करोग रूग्णांच्या नातेवाईकांना अनेक हालअपेष्टांना सामोरे जावे लागते. त्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांसाठी घेण्यात आलेल्या या पुढाकारामुळे अनेकांना याचा फायदा होईल तसेच दिलासाही मिळेल, असं फडणवीस म्हणाले.

फडणवीसांनी वडिलांबद्दलचा अनुभव सांगितला

देवेंद्र फडणवीस यांनी आपला अनुभवही सांगितला. आपल्या वडिलांना कर्करोगाच्या उपचारासाठी नेतानाचा अनेक रूग्णांच्या नातेवाईकांना तसेच रूग्णांनाही रस्त्यावर राहताना पाहिले आहे. रूग्णांच्या नातेवाईकांची गरज आणि मागणी लक्षात घेता या बाबु आरएन सिंह गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची तसेच अन्नाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अत्यल्प दरात अशी ही व्यवस्था गेस्ट हाऊसच्या पुढाकाराने करण्यात आली आहे. रूग्णसेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे, असेही फडणवीस म्हणाले.

फडणवीसांच्या हस्ते अतिथीगृहाचं उद्घाटन

कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी अतिथीगृह आणि जेवणाची व्यवस्था

उत्तर भारतीय संघाचे अध्यक्ष संतोष आरएन सिंह यांनी सांगितले की, ‘बाबू आर.एन. सिंह अतिथीगृह’ ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर  चालविण्यात येणार आहेत. महाराष्ट्रासह इतर राज्यातून विषेश म्हणजे  उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातून मोठ्या प्रमाणात कर्करोगग्रस्त रुग्ण उपचारासाठी मुंबईतील टाटा कॅन्सर रुग्णालयात येतात. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांनाही रुग्णालयाबाहेर रस्त्यावर राहावे लागत आहे. अशा रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना अतिशय अल्प दरात बाबू आर.एन. सिंह अतिथीगृह उपलब्ध करून दिले जातील. याशिवाय देवदर्शनाला येणाऱ्या नागरिकांना सुद्धा अतिथीगृह उपलब्ध करून देण्यात येईल. या अतिथीगृहात परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाचे जेवणही मिळणार आहेत.

तसंच संघाकडून नव्याने बांधण्यात आलेला विवाहगृह  एमएमआर प्रदेशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या उत्तर भारतीय कुटुंबांसाठी परवडणाऱ्या शुल्कात उपलब्ध करून दिला जाईल. यासोबतच संघाचे सामूहिक विवाह समारोह आयोजित करण्याची योजना आहे. यामध्ये 8 उत्तर भारतीय जोड्या असतील तर दोन मराठी जोड्या असतील, असंही ते सिंह म्हणाले.

इतर बातम्या :

Mosque Loudspeaker Crisis : ‘छेडेंगे तो छोडेंगे नहीं’, मुंब्रातील PFI चा मनसेला इशारा; तर महाराष्ट्रभर तांडव करु, मनसेचं प्रत्युत्तर

Nana Patole on RSS : देश तोडून अखंड भारत कसा साकार होईल?, सरसंघचालकांच्या वक्तव्यानंतर नाना पटोलेंचा सवाल

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.