क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही? अमृता फडणवीसांचं मुख्यमंत्री ठाकरेंवर ट्विट

विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला प्रत्युत्तर दिलं. आता फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 22:26 PM, 8 Apr 2021
क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही? अमृता फडणवीसांचं मुख्यमंत्री ठाकरेंवर ट्विट
अमृता फडणवीस यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

मुंबई : सध्या कोरोना लसीचा तुटवडा आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार यावरुन राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपमध्ये जोरदार राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. राज्यात पुढील 2 ते 3 दिवस पुरेल एवढात लसीचा साठा शिल्लक असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. त्यावर विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला प्रत्युत्तर दिलं. आता फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरच निशाणा साधला आहे. (Amrita Fadnavis criticizes Chief Minister Uddhav Thackeray)

“पहचान कौन? एक राजा जो- महल की चौखट से निकलता नही अवाम से कभी मिलता नही सत्य और कर्म की राह पर चलता नही वसूली के बिन उसका पत्त्ता हिलता नही महामारी का कहर उससे सम्हलता नही प्रगति का फूल उसकी छाया में खिलता नही ! सच है, धोखा कभी फलता नही। क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?”, असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलंय. या ट्वीटद्वारे त्यांनी नाव न घेता थेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. त्यामुळे शिवसेनेकडून याला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं महत्वाचं असेल.

कोरोना लसीवरुन फडणवीसांचं राज्य सरकारला प्रत्युत्तर

“केवळ तीन राज्यांनाच 1 कोटीपेक्षा अधिक लस प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान. यात गुजरात आणि राजस्थानची लोकसंख्या समान. (राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार) लसींचा पुरवठा हा लोकसंख्येच्या आधारावर नाही, तर त्या-त्या राज्यांच्या लसिकरणातील कामगिरीच्या आधारावर! महाराष्ट्राला 1.06 कोटी लस प्राप्त झाल्या. तसे ट्विट डीजीआयपीआरने 26 एप्रिल रोजी केले आहे. 91 लाख लसी वापरल्या. म्हणजे 15 लाख लस शिल्लक आहेत. मग, आज जाणिवपूर्वक केंद्र बंद करून लसींबाबत चुकीच्या बातम्या पसरविण्याचे कारण काय?” असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला विचारला आहे.

लसीचं राजकारण करु नका, फडणवीसांचं आवाहन

“व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाही, रेमडेसिवीर उपलब्ध नाही, ऑक्सिजन उपलब्ध नाही, साधे बेड उपलब्ध नाही! मुळात राज्य सरकार आपली जबाबदारी पूर्ण करत नाही.
लस येत आहेत, येत राहतील. पण, प्राथमिक सेवाही देता येत नसताना भयावह स्थिती निर्माण होऊ शकते. याकडे मुख्यमंत्री आणि मंत्री लक्ष देणार का?” असा प्रश्न विचारतानाच “राज्यातील कोरोना आणि लसीकरण हे महत्त्वाचे प्रश्न आहेतच. परंतू त्यासोबतच सरकारच्या गैरकारभारावर होत असलेली टीका आणि विविध प्रकरणात न्यायालयात निघत असलेले वाभाडे यावरून लक्ष विचलित करण्यासाठी व्हॅक्सिनवर राजकारण कृपया करू नये, ही कळकळीची विनंती आहे”, असा टोलाही फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे.

संबंधित बातम्या :

‘मोदींनी पाठवलेला रेशनचा तांदूळ विकला, आता लस विकू नका म्हणजे झालं’, भातखळकरांचा ठाकरे सरकारला टोला

महाराष्ट्राच्या भाजप नेत्यांची थेट मोदींकडे तक्रार? ठाकरे म्हणतात, समज द्या!

Amrita Fadnavis criticizes Chief Minister Uddhav Thackeray