AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dhananjay Munde case | धनंजय मुंडेंसाठी फडणवीसांची ढाल; पवारांकडून भाजपची कोंडी

शरद पवार हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा दाखला देत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Dhananjay Munde case | धनंजय मुंडेंसाठी फडणवीसांची ढाल; पवारांकडून भाजपची कोंडी
sagar joshi
sagar joshi | Updated on: Jan 15, 2021 | 3:02 PM
Share

मुंबई : धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्कारासारख्या गंभीर आरोपानंतर सूचक इशारा देणारे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता आपल्या भूमिकेत बदल केल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, रेणू शर्मा यांच्या विरोधातील काही बाजू भाजप आणि मनसेच्या नेत्यांनी समोर आणली आहे. त्यानंतर पवार यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत आता नरमाईची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. दुसरीकडे शरद पवार हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा दाखला देत भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळत आहे.(sharad pawar on devendra fadnavis)

एकीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. धनंजय मुंडे हे स्वत: राजीनामा देतील किंवा खुद्द शरद पवार त्यांचा राजीनामा घेतील असं चंद्रकांत पाटील गुरुवारी म्हणाले. तर भाजपचे आमदार अतुल भातखळकर आणि माजी खासदार किरिट सोमय्या यांनी थेट निवडणूक आयोगाकडेच तक्रार करत मुंडे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.

फडणवीसांची भूमिका काय?

दरम्यान, भाजपचेच नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट राजीनाम्याची मागणी न करता, प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. “धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायला हवी. धनंजय मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू”, अशी भूमिका फडणवीस यांनी गुरुवारी मांडली आहे.

भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न

फडणवीसांच्या याच भूमिकेचा आधार घेत शरद पवार यांनी भाजप नेत्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. “भाजपच्या एका नेत्यानं काळजीपूर्वक चौकशी करावी असं सांगितलं आहे. लगेच राजीनामा घेऊ नये असं त्यांनी म्हटलं. ते राज्याचे प्रमुख होते. संयमाने हे प्रकरण हाताळावं असं त्यांनी म्हटलं होतं”, अशा शब्दात शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कालच्या विधानाचा दाखला दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्याचा आधार घेत मुंडे यांचा राजीनामा मागणाऱ्या भाजप नेत्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत.

‘धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही’

धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप प्रकरणा संबंधित सतत सुरु असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी शरद पवार यांना धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाल्याशिवाय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली.

“राजीनामाचा विचार करण्याची गरज आहे की नाही यात मतभिन्नता असू शकते. आरोप करणाऱ्याबाबत एकापेक्षा एक अधिक गोष्टी पुढे आल्यानंतर त्यातील सत्यता समोर आली पाहिजे. नाहीतर कुणावरही आरोप करायचे आणि सत्तेपासून दूर व्हा, अशी प्रथा पडू शकते. त्यामुळे त्याची सत्यता पुढे यावी”, असं शरद पवार यांनी म्हटलंय.

संबंधित बातम्या :

नैतिकता महत्त्वाची, धनंजय मुंडे प्रकरणावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं भाष्य

Dhananjay Munde case | शरद पवारांचा सूचक इशारा, तरीही धनंजय मुंडेना राष्ट्रवादीकडून अभय?

sharad pawar on devendra fadnavis

Follow Us
भाजप शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने...
मोठी बातमी! भाजप-शिवसेनेत पडद्याआड मोठा संघर्ष! तिरंगा रॅलीतील 'त्या' व्हिडीओने चर्चांना उधाण
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत..
प्रताप सरनाईकांनंतर आता आणखी एका बड्या मंत्र्याचं 'ऑपरेशन टायगर'बाबत सुचक विधान, थेट म्हणाले...
नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला...
Video | नोकर आहात, नोकरांसारखे वागा; भर बैठीकीतच शिंदेंचा आमदार कडाडला, असं काय घडलं की...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?