Dhananjay Munde | यांना महाराष्ट्राचे महापुरुष नकोयत… राष्ट्रगीतही नकोय, धनंजय मुंडेंची राज्यपालांवर सडकून टीका!

देशाच्या संसदीय कामात आतापर्यंतच्या संसदीय कामकाजामध्ये कुठल्याही राज्यपाल महोदयाकडून झालेलं नाही. असं लयाला गेलेलं भाजप विचारसरणीचे राज्यपाल आणि भाजपचे आमदार, कार्यकर्ते आणि सभासदांचं हे कृत्य दिसतंय,' अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.

Dhananjay Munde | यांना महाराष्ट्राचे महापुरुष नकोयत... राष्ट्रगीतही नकोय, धनंजय मुंडेंची राज्यपालांवर सडकून टीका!
राहुल झोरी

| Edited By: मंजिरी धर्माधिकारी

Mar 03, 2022 | 1:54 PM

मुंबईः महाराष्ट्राच्या राज्यपालांना आपले महापुरुष नकोयत. अर्थसंकल्पातलं अभिभाषण नकोय आणि राष्ट्रगीतही नकोय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे (Dhanajay Munde) यांनी आज टीव्ही 9 शी बोलताना केली. महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सुरु झालंय. मात्र अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat singh Koshyari) यांच्याविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. अधिवेशनाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) आणि सावित्रीबाई फुले यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल राज्यपालांचा धिक्कार असो, अशा घोषणा महाविकास आघाडी सरकारतर्फे देण्यात आल्या. तसेच अधिवेशन सुरु झालं तेव्हा राज्यपालांच्या अभिभाषणाच्यावेळीही राज्यपालांविरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. त्यानंतर अभिभाषण अर्ध्यावरच सोडून राज्यपालांनी तेथून काढता पाय घेतला. त्यामुळे राज्यपालांनी भाषणही केलं आणि त्यानंतर होणाऱ्या राष्ट्रगीतासाठीही ते थांबले नाहीत, हा जनतेचा अपमान असल्याची टीका महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केली जात आहे.

काय म्हणाले धनंजय मुंडे?

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज विधिमंडळात अभिभाषण पूर्ण केलं नाही, हा महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली. tv9 च्या प्रतिनिधींशी बोलताना ते म्हणाले, ‘राज्यपालांचं अभिभाषण हा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सगळ्यात मोठा गाभा असतो. महाराष्ट्राला राज्यपालांचं अभिभाषणातून राज्याला सरकारची दिशा लक्षात येते.. राज्यपालांनी अभिभाषण न करता ते पटलावर ठेवलं. भाजपच्या सदस्यांनी गोंधळ घातला. अभिभाषण न करता राज्यपालांनी महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला. याची सुरुवात भाजपच्या सदस्यांनी केली. अपमान केल्यानंतर राष्ट्रगीतालाही राज्यपाल थांबले नाहीत, राज्यपालांनी राष्ट्रगीताचाही अपमान केला. हे असं कृत्य आजपर्यंत देशाच्या संसदीय कामात आतापर्यंतच्या संसदीय कामकाजामध्ये कुठल्याही राज्यपाल महोदयाकडून झालेलं नाही.
असं लयाला गेलेलं भाजप विचारसरणीचे राज्यपाल आणि भाजपचे आमदार, कार्यकर्ते आणि सभासदांचं हे कृत्य दिसतंय,’ अशी टीका त्यांनी केली.

‘त्यांना महापुरुष नकोयत अन् राष्ट्रगीतही नकोय’

राज्यपालांवर टीका करताना धनंजय मुंडे पुढे म्हणाले, ‘ या राज्यपाल महोदयांना महाराष्ट्राची जनता माहीत नाही. महाराष्ट्राची संसदीय कामकाज आणि नियम माहीत नाहीत.. त्यांना महाराष्ट्राचे महापुरुष नकोयत. त्यांना अर्थसंकल्पात त्यांचं भाषण नकोय. आणि एवढंच नाही तर त्यांना राष्ट्राचं राष्ट्रगीतही नकोय…’

इतर बातम्या-

नवाब मलिक यांना पाठिशी घालणार असेल तर, ठाकरे सरकार हे दाऊद इब्राहिम समर्पित सरकार- फडणवीस

Sunil Grover : शस्त्रक्रियेनंतर पहिल्यांदाच सुनील ग्रोव्हर कॅमेऱ्यासमोर, तब्येतीविषयी म्हणाला…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें