AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामतीतल्या धनगर समाजाचा अजित पवारांना पाठिंबा

भाजपचे बारामतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर (Baramati Gopichand Padalkar) यांचाही या बैठकीत विरोध करण्यात आला. त्यामुळे बारामतीतल्या धनगर समाजाने राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवारांना पाठिंबा जाहीर केला आहे.

बारामतीतल्या धनगर समाजाचा अजित पवारांना पाठिंबा
| Edited By: | Updated on: Oct 02, 2019 | 5:54 PM
Share

बारामती : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजातील नेत्यांची बारामतीत महत्वपूर्ण बैठक पार पडली. भाजपने धनगर (Baramati Gopichand Padalkar) समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. भाजपचे बारामतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर (Baramati Gopichand Padalkar) यांचाही या बैठकीत विरोध करण्यात आला. त्यामुळे बारामतीतल्या धनगर समाजाने राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवारांना पाठिंबा जाहीर केला आहे.

बारामतीतल्या अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या सभागृहात झालेल्या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, पुणे जिल्हा बँकेचे संचालक मदन देवकाते, दत्तात्रय येळे, संजय देवकाते, रमेश गोफणे, दूध संघाचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव देवकाते यांच्यासह धनगर समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. भाजपाचे धनगर नेते बैठकीला अनुपस्थित होते.

अजित पवार वि. गोपीचंद पडळकर

विधानसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीतच अडकवून ठेवण्याच्या उद्देशाने भाजपने धनगर समाजातील युवा नेते गोपीचंद पडळकर (Baramati Gopichand Padalkar) यांना निवडणूक रिंगणात उतरवलंय. अचानकपणे गोपीचंद पडळकर यांची बारामतीत एंट्री झाल्याने बारामतीची लढत रंगतदार होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल, त्यावेळी भाजपने वापरलेली यंत्रणा लक्षात घेता आता या विधानसभेत कितपत प्रभाव पडणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय.

लोकसभेला राष्ट्रवादीचं वर्चस्व

लोकसभा निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी बारामतीत (Baramati Gopichand Padalkar) तळ ठोकत पवारांना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. भाजपाध्यक्ष अमित शाहांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात सभा घेत रान पेटवलं होतं. त्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना दगाफटका बसतो की काय अशी चिन्ह दिसत असतानाच 2014 च्या तुलनेत तब्बल दीड लाखांचं मताधिक्य मिळवत सुप्रिया सुळे विजयी झाल्या.

बारामतीला स्वातंत्र्य देण्यासाठी निवडणूक : पडळकर

विशेष म्हणजे या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना बारामती विधानसभा मतदारसंघातून तब्बल 1 लाख 28 हजारांचं मताधिक्य मिळालं. त्यानंतर आता भाजपने धनगर समाजातील युवा नेते गोपीचंद पडळकर (Baramati Gopichand Padalkar) यांना बारामतीतून अजित पवार यांच्या विरोधात उमेदवारी दिली आहे. गोपीचंद पडळकर यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. बारामती तालुक्यातल्या मतदारांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपण निवडणूक रिंगणात आल्याचं पडळकर यांनी सांगितलंय. बारामतीत सर्व काही आलबेल असल्याचं दाखवलं जात असलं तरी अनेक प्रश्न आजही प्रलंबित असल्याने त्याची सोडवणूक करण्यासाठी ही निवडणूक लढवत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

एक लाखांच्या फरकाने जिंकणार : अजित पवार

दुसरीकडे अजित पवार यांनी एक लाखापेक्षा अधिक मतांनी बारामती जिंकू, असा विश्वास व्यक्त केला. घटनेने कोणालाही कुठेही उभा राहण्याचा अधिकार दिला आहे. आजपर्यंत आपण समोरचा उमेदवार (Baramati Gopichand Padalkar) कोणीही असला तरी तुल्यबळ समजूनच प्रचार यंत्रणा राबवतो. त्यामुळे याही निवडणुकीत आघाडीची ताकद उभी करून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवू, असंही त्यांनी म्हटलंय. आपण बारामतीकरांच्या वतीने चंद्रकांतदादा पाटील, गोपीचंद पडळकर यांच्यासह ज्यांना बारामतीत यायचं असेल त्याचंही स्वागत करतो, असं सांगायलाही ते विसरले नाहीत.

भाजपचा पडळकर फॅक्टर चालणार का?

भाजपने गोपीचंद पडळकर यांची उमेदवारी केवळ चर्चा व्हावी यासाठी जाहीर केली का अशी शंका उपस्थित होत असल्याचं राजकीय विश्लेषक ज्ञानेश्वर जगताप सांगतात. मुळातच बारामतीत अजित पवार यांच्या माध्यमातून मोठी कामे झाली आहेत. आजपर्यंतचा बारामतीचा इतिहास पाहता बारामतीकरांनी विकासाला साथ दिली. त्यामुळे गोपीचंद पडळकर (Baramati Gopichand Padalkar) यांच्यामुळे बारामतीत काही उलथापालथ होईल याबद्दल साशंकताच आहे. आयात उमेदवार असल्याने स्थानिक भाजप कार्यकर्ते काम करतील का याबाबतही प्रश्नचिन्ह असल्याचं ते सांगतात.

आजवरचा इतिहास पाहता बारामतीकरांनी पवार कुटुंबीयांना अविरतपणे साथ दिली. त्यातच आता गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देत भाजपने नवीन खेळी खेळण्याचा प्रयत्न केलाय. पण त्याला स्थानिक मतदार कितपत साथ देतात ते महत्त्वाचं आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...