धुळ्यात अनिल गोटेंच्या पत्नीचा विजय, मुलाचा पराभव

धुळे : भाजप विरुद्ध भाजप लढाईत कोण जिंकणार याचा निर्णय अखेर लागलाय. भाजपविरोधात बंड पुकारणाऱ्या आमदार अनिल गोटेंच्या लोकसंग्राम पक्षाचा केवळ एक उमेदवार निवडून आलाय. भाजपने 50 जागा मिळवत धुळे महापालिकेत बहुमत मिळवलंय. धुळे महापालिकेच्या 19 प्रभागातील 74 जागांसाठी मतमोजणी पार पडली. रविवारी पार पडलेल्या या मतदानात 60 टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. भाजपचे …

धुळ्यात अनिल गोटेंच्या पत्नीचा विजय, मुलाचा पराभव

धुळे : भाजप विरुद्ध भाजप लढाईत कोण जिंकणार याचा निर्णय अखेर लागलाय. भाजपविरोधात बंड पुकारणाऱ्या आमदार अनिल गोटेंच्या लोकसंग्राम पक्षाचा केवळ एक उमेदवार निवडून आलाय. भाजपने 50 जागा मिळवत धुळे महापालिकेत बहुमत मिळवलंय. धुळे महापालिकेच्या 19 प्रभागातील 74 जागांसाठी मतमोजणी पार पडली. रविवारी पार पडलेल्या या मतदानात 60 टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला होता. भाजपचे आमदार अनिल गोटे यांच्या त्यांच्याच पक्षाला दिलेल्या आव्हानामुळे ही निवडणूक चर्चेचा विषय बनली होती.

भाजपने गुंडांना तिकीट दिल्याचा आरोप करत अनिल गोटेंनी पक्षावर गंभीर आरोप केले होते. शिवाय भाजपने गोटेंच्या नेतृत्त्वात निवडणूक न लढवल्यामुळेही त्यांची नाराजी होती. गोटेंनी त्यांच्या पत्नी हेमा गोटे यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं होतं. प्रभाग 5 ब मधून भाजप उमेदवार भारती मोरे यांचा पराभव करत हेमा गोटे यांनी विजय मिळवला.

भारती मोरे या अनिल गोटे यांचे विरोधक मनोज मोरे यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे अनिल गोटे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. पण अनिल गोटे यांना आपल्या मुलाला निवडून आणण्यात अपयश आलं. पुत्र तेजस गोटे यांचा महापालिकेच्या निवडणुकीत पराभव झाला.

अनिल गोटेंची भाजपविरोधात नाराजी कशामुळे?

भाजपने धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्त्वात लढावी अशी गोटेंची इच्छा होती. पण ही जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय राज्य मंत्री सुभाष भामरे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर दिली. भाजपने 50 जागा जिंकत एकहाती सत्ता मिळवली. नाराज झालेल्या गोटेंनी त्यांच्या लोकसंग्राम पक्षाचे उमेदवार मैदानात उतरवले होते. पण या पक्षाचा केवळ एकच उमेदवार निवडून येऊ शकला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *