काल अमरावतीत, आज धुळ्यात, पाकिटमारामुळे झेडपी मतमोजणीवेळी राडा, नेमकं काय घडलं?

काल अमरावती जिल्हा बँक निवडणुकीच्या मतमोजणी वेळी एका भुरट्या चोरानं पाकिट मारण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन अमरावतीमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. आज त्याची पुनरावृत्ती धुळे जिल्ह्यात दिसून आली आहे.

काल अमरावतीत, आज धुळ्यात, पाकिटमारामुळे झेडपी मतमोजणीवेळी राडा, नेमकं काय घडलं?
Dhule theft
Follow us
| Updated on: Oct 06, 2021 | 12:41 PM

धुळे: राज्यात जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुकांसाठी मतदान पार पडलं आहे. धुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. काल अमरावती जिल्हा बँक निवडणुकीच्या मतमोजणी वेळी एका भुरट्या चोरानं पाकिट मारण्याचा प्रयत्न केला. त्यावरुन अमरावतीमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. आज त्याची पुनरावृत्ती धुळे जिल्ह्यात दिसून आली आहे. धुळे मतमोजणी केंद्रावर पाकिटमाराला पकडलं. जमलेल्या गर्दीत हात सफाई करतांना लोकांनी पाकिटमाराला रंगेहाथ पकडलं आहे.

धुळ्यात नेमकं काय घडलं?

धुळे जिल्ह्यात मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. गर्दीचा फायदा घेत पाकिटमारानं चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाकिटमाराचा डाव फसल्यानं तो पकडला गेला. मोठा गोंधळ आणि मारामारी मतमोजणी केंद्राबाहेर झाली. आक्रमक गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी, पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. परिस्थिती निंयत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

संशयित पोलिसांच्या ताब्यात

धुळ्यात भाजपनं सत्ता राखली

राज्यात जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुकांसाठी मतदान पार पडलं आहे. धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं 29 ची मॅजिक फिगर क्रॉस केली आहे. गुजरात भाजप प्रदेशाध्यक्षांची कन्या जिल्हा परिषद निवडणुकीत धरती देवरे या लामकने गटातून विजयी झाल्या आहेत. धरती देवरे लामकने गटातून भाजप कडून निवडणूक लढवत होत्या धरती देवरे या गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सी आर पाटील यांच्या कन्या आहेत. गेल्या वेळेस धरती देवरे बिनविरोध विजयी झाल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या 15 आणि पंचायत समितीच्या 30 जागांसाठी मतदान प्रक्रिया जाहीर झाली. त्यापैकी एका गटात शिवसेनेचा उमेदवार आणि दोन पंचायत समिती गणात बिनविरोध निवडणूक पार पडली. त्यामुळे प्रत्यक्ष 14 जिल्हा परिषद गट आणि 28 पंचायत समिती गणात मतदान झालं आहे. धुळे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता होती. जिल्हा परिषदेच्या एकूण 56 जागांपैकी भाजपकडे 27 झागा आहेत. तर शिवसेनेकडे 2, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 3 आणि काँग्रेसकडे 6 जागा आहेत. भाजपनं आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 5 जागांवर विजय मिळवत सत्ता कायम राखली आहे.

इतर बातम्या:

Maharashtra ZP and Panchayat Election Results 2021 LIVE: जिल्हा परिषद-पंचायत समितीचा निकाल, गुलाल कुणाचा?, राज्याचं लक्ष!

Nandurbar election result 2021 : दीदी जिंकली, दादा हरला, माजी मंत्र्यांच्या मुलीचा विजय, पुतण्या पराभूत

Dhule ZP Panchayat Samiti election 2021 live updates counting theft caught by public at counting center police lathi charge on mob

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.