‘सीएमबद्दल बोलाल तर पीएमची आठवण करून देऊ, महाराष्ट्र मोडेल पण…’, दिपाली सय्यद यांनी पुन्हा भाजपला ललकारलं

शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद आणि भाजपमधलं युद्ध सध्या चांगलंच पेटलंय. आजही दिपाली सय्यद यांनी पुन्हा एकदा भाजपला ललकारलंय.

'सीएमबद्दल बोलाल तर पीएमची आठवण करून देऊ, महाराष्ट्र मोडेल पण...', दिपाली सय्यद यांनी पुन्हा भाजपला ललकारलं
Follow us
| Updated on: May 31, 2022 | 1:21 PM

मुंबई : शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद (Dipali Sayyad) आणि भाजपमधलं (BJP) युद्ध सध्या चांगलंच पेटलंय. आजही दिपाली सय्यद यांनी पुन्हा एकदा भाजपला ललकारलंय. “मुख्यमंत्र्यांबद्दल बोलाल, तर पंतप्रधांनांची आठवण करून देऊ, महाराष्ट्र मोडेल पण दिल्लीसमोर वाकणार नाही”, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलंय. याबाबतचं ट्विट त्यांनी केलं आहे.

“अंगावर आलात तर आम्ही शिंगावर घेऊ, मुख्यमंत्र्याबद्दल बोलाल तर पंतप्रधानांची आठवण करून देऊ… दिल्लीत मुजरा करणार्यांना महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवुन देऊ! दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकणार नाही. मोडेल पण वाकणार नाही! जय महाराष्ट्र…” , असं ट्विट दिपाली सय्यद यांनी केलंय.

हे सुद्धा वाचा

दिपाली सय्यद यांचं ट्विट

पंतप्रधानांवर टीकास्त्र

दिपाली सय्यद विरुद्ध भाजप असा सामना सध्या रंगतोय. दिपाली सातत्याने भाजपवर टीकेचे बाण सोडत आहेत. त्यांनी पंतप्रधानांबाबत आणखी एक विधान केलं होतं. जे प्रचंड चर्चेत आहे. दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर परखड शब्दात टीका केली. “नरेंद्र मोदी आणि अमित शाह तुम्ही मसनात जा”, असं दिपाली सय्यद म्हणाल्या. शिवाय “वाढती महागाई , दरवाढी आटोक्यात येत नसेल तर हिमालयात जाऊन संन्यास घ्या”, असंही त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानाची जोरदार चर्चा झाली.

फडणवीसांना आव्हान

“माझी बायको माझं ऐकत नाही, वाऱ्यावर सोडलीय, म्हणून तुम्ही खपवून घेता. अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांवर टीका करतात त्यांना कुणी बोलत नाही, मग मला रोखण्याचा अधिकार नाही”, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलंय. आपल्या मुख्यमंत्र्याबद्दल हे सर्व बोललं जातंय. हे आम्ही खपवून घेणार नाही. त्यांना जश्यास तसं मी दिलंय. पंतप्रधानांवर बोललं तर यांना झोमतं मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबद्दल हे कुठल्या अधिकारवाणीने बोलतात? त्यांचं बोलणं चालतं का?, त्यांना कुणी विचारत नाही, असंही त्या म्हणाल्या आहेत. त्या टीव्ही 9 मराठीशी बोत होत्या.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.