AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray वर बोलू नका असदुद्दीन ओवेसीचा फतवा, एमआयएम कार्यकर्त्यांना फर्मान; इम्तियाज जलील यांची माहिती

काल राज ठाकरेंनी (Raj Thackeray) गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कात (Shivaji park) मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांवरती सडकून टीका केली. मशिदीवरील भोंगे खाली उतरवावे उतरावे लागतील, त्याचबरोबर माझा मुस्लिमांच्या प्रार्थनेला विरोध नाही. ज्या मशिदीच्या (Masjid) बाहेर भोंगे लागलेले असतील.

Raj Thackeray वर बोलू नका असदुद्दीन ओवेसीचा फतवा, एमआयएम कार्यकर्त्यांना फर्मान; इम्तियाज जलील यांची माहिती
माकडांच्या उड्या सुरु आहेत, महाराष्ट्रातल्या सत्ता नाट्यावर ओवैसी म्हणतात, बघवत नाही पण बघावं लागतंयImage Credit source: twitter
| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 1:11 PM
Share

औरंगाबाद – काल राज ठाकरेंनी (Raj Thackeray) गुढी पाडव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कात (Shivaji park) मेळावा घेतला. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांवरती सडकून टीका केली. मशिदीवरील भोंगे खाली उतरवावे उतरावे लागतील, त्याचबरोबर माझा मुस्लिमांच्या प्रार्थनेला विरोध नाही. ज्या मशिदीच्या (Masjid) बाहेर भोंगे लागलेले असतील. त्या मशिदी समोर भोंग्यांच्या समोर दुप्पट स्पीकर लावून त्यावर हनुमान चालीसा लावा असं काल राज ठाकरेंनी त्यांनी वक्तव्य केलं होतं. काल झालेल्या राज ठाकरेंच्या भाषणावरती राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील टीका केली आहे. राज ठाकरेंवर बोलू नका असदुद्दीन ओवेसीनी (Asaduddin Owaisi)फतवा काढला आहे. एमआयएम कार्यकर्त्यांना कोणत्याही गोष्टीवर बोलायचं नाही ठणकावून सांगण्यात आलं आहे. राज ठाकरेंच्या कुठल्याही वक्तव्यावरती टीका करायची नाही असं ओवेसी यांनी सांगितलं आहे अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

मशिदींसमोर दुहेरी लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचा जप करू

राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे त्यांच्या पक्षाच्या वार्षिक गुढीपाडवा मेळाव्याला काल संबोधित केले. मशिदींतील लाऊडस्पीकरबाबत सरकार काही निर्णय घेणार नसेल, तर मशिदींसमोर दुहेरी लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचा जप करू, असा इशारा राज ठाकरेंनी आपल्या धडाकेबाज शैलीत दिला. मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील मशिदी आणि मदरसांची पोलिसांनी नीट तपासणी केल्यास त्यांना अनेक गोष्टी कळतील, असेही ते म्हणाले. त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणची बदलती लोकसंख्या अधोरेखित केली आणि पाकिस्तान आणि बांगलादेशातून अनेक मुस्लिम येथे येऊन स्थायिक झाल्याचा आरोप केला.

सत्ताधाऱ्यांवरती सडकून टीका

भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे यांनी कोविड-19 महामारी आणि लॉकडाऊनच्या कठीण काळात शिस्त पाळल्याबद्दल पोलीस दलाचे आभार मानले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील मतदारांनी दिलेल्या जनादेशाचा अनादर करत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्याची टीका केली. त्यानंतर राज ठाकरेंनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटके पेरण्यापासून ते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या अटकेपर्यंतचा संपूर्ण प्रसंग प्रेक्षकांना स्मरण करून दिला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्रिमंडळात आणल्याबद्दलही त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर हनुमान चालिसा सुरू, घाटकोपरपासून सुरूवात; मुंबईचं राजकीय वातावरण तापणार?

sharad pawar on kashmir files: गुजरातची हिंसा यापेक्षा भयंकर होती, रेल्वेचा डबा पेटवला, शेकडो मेले; शरद पवारांनी दाखवला भाजपला आरसा

ED Enquiry : राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदेसह पुत्राची ईडीकडून चौकशी, प्रकरण 500 कोटींच्या घरात जात असल्याची माहिती

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...