भोपाळमधील डमी उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज मागे

मुंबई : मध्य प्रदेशमधील भोपाळ मतदारसंघात डमी उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र या प्रज्ञा ठाकूर भाजपच्या उमेदवार नसून अपक्ष उमेदवार आहेत. भोपाळ मतदारसंघात एकाच नावाच्या दोन उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या. त्यामुळे याचा फटका भाजप उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना बसला असता. मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघात भाजपकडून प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी …

भोपाळमधील डमी उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज मागे

मुंबई : मध्य प्रदेशमधील भोपाळ मतदारसंघात डमी उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मात्र या प्रज्ञा ठाकूर भाजपच्या उमेदवार नसून अपक्ष उमेदवार आहेत. भोपाळ मतदारसंघात एकाच नावाच्या दोन उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या. त्यामुळे याचा फटका भाजप उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना बसला असता.

मध्य प्रदेशातील भोपाळ मतदारसंघात भाजपकडून प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी देण्यात आली. पण याच मतदारसंघात प्रज्ञा ठाकूर नावाचा आणखी एक उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने भाजपला याचा फटका बसण्याची शक्यता होती. त्यामुळे अपक्ष उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत, भाजप उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांना पाठिंबा दिला आहे.

एकाच नावाच्या दोन व्यक्ती निवडणूक रिंगणात असल्याने मतदारांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता भाजपच्या कार्यकर्त्यांकडून वर्तवली जात होती. तसेच मतदार दोन्ही नावाच्या गोंधळात प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या ऐवजी अपक्ष उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांच्या नावासमोरील बटन दाबतील अशी भीती भाजपला वाटत होती.

हा गोंधळ दूर करण्यासाठी भाजप उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी स्वत: अपक्ष उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी विनंती केली. अपक्ष उमेदवार प्रज्ञा ठाकूर यांनी भाजपच्या प्रज्ञा ठाकूर यांची घरी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *