AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडी समोर झुकणार नाही, मुख्यमंत्री पद सोडणार नाही, आमदारांचाही पाठींबा, आता लक्ष ईडीच्या कारवाईकडे

ईडीने पाठविलेल्या सातव्या समन्सवरही झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ईडीसमोर हजर राहण्याचे टाळले. मुख्यमंत्री हेमंत सोरे यांनी मंगळवारी यांनी ईडी कार्यालयाला एक तीन पानी पत्र पाठवले आहे.

ईडी समोर झुकणार नाही, मुख्यमंत्री पद सोडणार नाही, आमदारांचाही पाठींबा, आता लक्ष ईडीच्या कारवाईकडे
CHIEF MINISTER HEMANT SORENImage Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Jan 03, 2024 | 9:08 PM
Share

रांची | 03 जानेवारी 2024 : ईडीने पाठविलेल्या सातव्या समन्सवरही झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ईडीसमोर हजर राहण्याचे टाळले. तर, रांची येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पक्षाच्या आमदारांची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये सर्वच आमदारांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना पाठींबा दिला. या बैठकीला 43 आमदार उपस्थित होते. हेमंत सोरेन हे ​​मुख्यमंत्री आहेत आणि आगामी काळातही तेच मुख्यमंत्री राहतील, असा निर्णय सदर बैठकीत घेण्यात आला अशी माहिती आमदार आमदार प्रदीप यादव यांनी दिली.

ईडीने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना २९ डिसेंबर रोजी एक नोटीस जारी केली. यामध्ये मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात जबाब नोंदवण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली. तसेच, मुख्यमंत्री यांनी त्यांच्या सोयीनुसार जागा आणि वेळ देण्याचे आवाहनही या नोटीसमधून करण्यात आले होते. ईडीने दिलेली मुदत ३१ डिसेंबर रोजी संपली.

मुख्यमंत्री हेमंत सोरे यांनी मंगळवारी यांनी ईडी कार्यालयाला एक पत्र पाठवले. मुख्यमंत्री सचिवालयातील एक कर्मचारी दुपारी लिफाफा घेऊन ईडी कार्यालयात पोहोचला. तो लिफाफा त्यांनी ईडी कार्यालयात उपस्थित अधिकाऱ्यांना दिला आणि ते तेथून निघून गेले. तीन पानी पत्रामध्ये हेमंत सोरेन यांनी ही चौकशी बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली. त्याचप्रमाणे ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित करणे म्हणजेच हेमंत सोरेन यांचा तपासासाठी एजन्सीसमोर येण्याचा कोणताही विचार नाही हे स्पष्ट होते असेही सूत्रांनी सांगितले.

हेमंत सोरेन यांनी ईडीची चौकशी टाळली. त्यामुळे त्यांच्या अटकेची भीती व्यक्त केली जात आहे. याच दरम्यान झारखंड मुक्ती मोर्चाचे गांडे विधानसभेचे आमदार सरफराज अहमद यांनी सोमवारी अचानक राजीनामा दिला. त्यामुळे विरोधी पक्ष भाजपने सोरेन यांना अटक झाल्यास मुख्यमंत्री पद सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांच्याकडे सोपवू शकतात. त्यामुळे अहमद यांना राजीनामा देण्यास भाग पाडले गेले असा दावा केला.

याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सोरेन यांनी आमदारांची त्यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. यावेळी सर्व आमदारांनी हेमंत सोरेन यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, आमदारांनी घेतलेल्या या निर्णयानंतरही ईडीच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. ईडी आता काय कारवाई करणार याची प्रतीक्षा लागली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.