मुंबई : राज्यात सध्या राज्यसभेच्या निवडणूकीवरून (Rajya Sabha elections) वातारण गरम होत आहे. आज सकाळपासूनच राज्यसभेच्या निवडणूकीसाठी विधानभवनात सगळे नेते हजेरी लावली आणि मतदानही पार पाडले. मात्र त्यानंतर भाजपकडून (BJP) राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे संतोष कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेण्यात आला. तर महाविकास आघाडीकडून सुधीर मुनगंटीवार आणि रवी राणा यांचे मत बाद करण्याची मागणी करण्यात आल्याने हे प्रकरण निवडणूनक आयोगाकडे दिल्लीला गेलं आहे. त्यामुळे आज याचा निकाल लागणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. याच दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाख खडसे (NCP leader Eknakh Khadse) यांनी भाजपवर हल्ला करताना भाजप आता केंद्रीय तपास यंत्रणाचा आधार घेत असल्याचा आरोप केला आहे. तसेच भाजपकडून राज्यसभेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार होणार असल्याची चर्चा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी हे वक्ततव्य राज्यसभेचा जसा निकाल लांबला तसे केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात घोडेबाजार होणार का असे सवाल उपस्थित केले जात आहेत.