खडसे साहेब, एखादा शूटर लावून मला मारुन टाका : आमदार चंद्रकांत पाटील

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि मुक्ताईनगरचे (Muktainagar) शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील (Shiv Sena MLA Chandrakant Patil) यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे.

खडसे साहेब, एखादा शूटर लावून मला मारुन टाका : आमदार चंद्रकांत पाटील
एकनाथ खडसे, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 8:37 AM

जळगाव : जळगावात शिवसेना (Shiv Sena) विरुद्ध एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यातील राजकारण तापलं आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि मुक्ताईनगरचे (Muktainagar) शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील (Shiv Sena MLA Chandrakant Patil) यांच्यात टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. एखादा शूटर लावून मला मारून टाका, असं आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.

एकनाथ खडसे यांनी माझ्या संदर्भात लेव्हल सोडून बोलू नये, एकनाथ खडसे यांनी लेव्हल सोडल्यास मी देखील लेव्हल सोडून बोलेन. मी एकनाथ खडसे यांचा कधीही अनादर केला नाही. त्यामुळे एकनाथ खडसे यांनी तोंडाला कुलूप लावावे, असं चंद्रकांत पाटी म्हणाले.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी बोदवड येथे एका व्हायरल ऑडिओ क्लिपबाबत माहिती देत, मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता टीका केली होती. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीदेखील पत्रकार परिषद घेत एकनाथ खडसे यांना उत्तर दिलं. “एकनाथ खडसे हे मी युती तोडली असं अहंकाराने आजही ते सांगतात. पण सध्या एकनाथ खडसे यांचं डोकं ठिकाणावर नाही. पक्ष बदलल्यानंतरदेखील एकनाथ खडसे यांना अजूनपर्यंत काही मिळाले नाही. त्यातच भोसरी भूखंड प्रकरणात खडसेंना कधी लपावं लागतं, तर कधी पळावं लागतं अशी परिस्थिती आहे. त्यांना तीन तीन वेळा कोविड त्यांना होतो, त्यामुळे त्यांच्याविषयी मला सहानुभूती आहे” अशी मिश्कील टीका शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

शूटर लावून मारुन टाका

व्हायरल ऑडिओ क्लिप बाबत एकनाथ खडसे हे माझे नाव जोडत आहेत. खडसेंनी ही क्लिप मतदार संघातील सर्व मतदारांपर्यंत पोहोचावी. जेणेकरून कोणाची काय पात्राता आहे हे मतदारांना कळेल. मी आणि माझे कुटुंब अत्यंत साधेपणाने जगतोय. त्यामुळे खडसेंना असं वाटत असेल तर त्यांनी एखादा शूटर लावून मला मारुन टाकावं. माझं छोटे कुटुंब असून, माझ्या बाजूने कोणी बोलणारेही नाही. आजही मी रात्री 10 वाजता घराला कुलूप लावून राहतो. ही स्थिती आहे, अशी प्रतिक्रिया आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.

संबंधित बातम्या 

प्रचलित पद्धतीने शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत म्हणजे एकप्रकारची टिंगल, एकनाथ खडसेंचा घरचा आहेर

मास्तराच्या मुलाची संपत्ती हजार बाराशे कोटींची कशी?, त्यांची चौकशी का होत नाही?; नाथाभाऊंचा सवाल

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.