Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी स्वीकारला मुख्यमंत्रीपदाचा पदभार; छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेबांना अभिवादन

आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला आहे. मंत्रालयात दाखल होताच त्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी महापुरुषांना अभिवादन केले.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी स्वीकारला मुख्यमंत्रीपदाचा पदभार; छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेबांना अभिवादन
अजय देशपांडे

|

Jul 07, 2022 | 2:15 PM

मुंबई : आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाचा (CM) पदभार स्वीकारला आहे. मंत्रालयात  दाखल होताच त्यांनी पदभार स्वीकारण्यापूर्वी महापुरुषांना अभिवादन केले. एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात दाखल झाल्यानंतर सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला. दरम्यान पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवसापासून एकनाथ शिंदे यांनी कामाला सुरुवात केली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीबाबत दीपक केसरक (Deepak Kesarak) यांनी माहिती दिली. या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या विकास कांमासाठी निधी संदर्भात चर्चा होऊ शकते असे केसरकर यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी बोलताना केसरकर यांनी शिवसेनेवर देखील निशाणा साधला आहे.

काय म्हणाले केसरकर?

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला,  मंत्रालयात येताच त्यांनी सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी बोलताना दीपक केसरकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवसापासून मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारून कामाला सुरुवात केली होती. आज ही केवळ औपचारीकता होती. आज मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्यासोबत एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार असल्याचे केसरकर यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी यावेळी बोलताना महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर देखील निशाणा साधला आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेवर निशाणा

यावेळी बोलताना केसरकर यांनी शिवसेनेवर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर देखील अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्विकारला. मुख्यमंत्र्यांची जिथे कॅबिन असते, त्याच्या शेजारीच आमदार आणि खासदारांसाठी प्रतिक्षालय असते. तिथे मुख्यमंत्र्यांची भेट घेता येते. त्यांच्यासोबत विविध प्रश्नांवर चर्चा करता येते. सत्तेत आल्यानंतर आम्ही आज पहिल्यांदाच इथे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधल्याचे त्यांनी म्हटले आहे. आज एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला यावेळी त्यांचे कार्यालये आकर्षक फुलांनी सजवण्यात आले होते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें