AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shinde Cabinet: अखेर शिंदेंच्या मंत्रिमंडळात महिलांना स्थान मिळणार, 2 मंत्रिपदं महिलांकडे, सूत्रांची माहिती, कोणती नावं चर्चेत? वाचा…

Eknath Shinde: अखेर आता शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात महिलांना स्थान मिळणार आहे. येत्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान मिळणार आहे.

Shinde Cabinet: अखेर शिंदेंच्या मंत्रिमंडळात महिलांना स्थान मिळणार, 2 मंत्रिपदं महिलांकडे, सूत्रांची माहिती, कोणती नावं चर्चेत? वाचा...
| Updated on: Aug 23, 2022 | 12:16 PM
Share

मुंबई : अखेर आता शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळात महिलांना स्थान मिळणार आहे. येत्या मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) महिलांना स्थान मिळणार आहे. 9 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार झालाय. यात शिंदे गटाच्या 9 तर भाजपच्या 18 आमदारांनी शपथ घेतली. पण या अठरा जणांमध्ये एकाही महिला नेत्याला स्थान दिलेलं नव्हतं. त्यावरून भरपूर टीकाही झाली. पण आता पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना (Women Leaders) संधी मिळणार आहे. दोन महिला आमदारांना मंत्रिपदं दिली जाणार आहेत. एक कॅबिनेट तर दुसरं राज्यमंत्रीपद महिलांना दिलं जाणार आहे. त्यामुळे प्रचंड टीकेला सामोरं गेल्यानंतर अखेर आता महिलांना मंत्रिमंडळाच्या विस्तारात स्थान मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोणती नावं चर्चेत

देवयानी फरांदे, माधुरी मिसाळ या दोन नावांची जोरदार चर्चा आहे. देवयानी फरांदे या नाशिकच्या आमदार आहेत. तर माधुरी मिसाळ या पुण्याच्या आहेत. तर मनिषा चौधरी आणि सीमा हिरे या दोघींचीही नावं चर्चेत आहेत. मनिषा हिरे या नाशिकच्या आहेत. विशेष म्हणजे या चारही महिला नेत्या या भाजपच्या आहेत.

9 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खातेवाटप झालं. सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ ही खाती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. तर गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील.

कुणाकडे कोणतं खातं?

राधाकृष्ण विखे-पाटील: महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार: वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील: उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित: आदिवासी विकास

गिरीष महाजन: ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण

गुलाबराव पाटील: पाणीपुरवठा व स्वच्छता

दादा भुसे: बंदरे व खनिकर्म

संजय राठोड: अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे: कामगार

संदीपान भुमरे: रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत: उद्योग

प्रा.तानाजी सावंत: सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणरवींद्र चव्हाण: सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार: कृषी

दीपक केसरकर: शालेय शिक्षण व मराठी भाषा

अतुल सावे: सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई: राज्य उत्पादन शुल्क

आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख..
आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या ZP निवडणुकांची मोठी अपडेट सुनावणीची तारीख...
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?
महापौर निवड प्रक्रियेला वेग; भाजप- सेना वेगवेगळा गट स्थापन करणार?.
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?
भाजप ठाकरेंच्या सेनेसोबत सत्ता स्थापन करणार?.
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक
हा देश कोण्या एका धर्माचा नाही, जलील यांच्या विधानानंतर शिरसाट आक्रमक.
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद
पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यावर भगतसिंग कोश्यारींनी व्यक्त केला आनंद.
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले
ना भगव्यावर प्रेम ना...त्या वादावर काँग्रेसच्या बड्या नेत्याने फटकारले.
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता
पोस्टर लागले, तक्रारही दिली, तरीही सापडेना, आता तर कुटुंबीयही बेपत्ता.
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी
हिरव्या रंगाच्या वादात आता संजय राऊतांची उडी.
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी
मुंब्रा हिरवा करू... वादाला इम्तियाज जलील यांच्याकडून पुन्हा फोडणी.
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.