Eknath Shinde: दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेचं समर्थन कसं? एकनाथ शिंदेंचा सवाल, भाजपची स्क्रिप्ट वाचतायत?

मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते? असा सवाल शिंदे यांनी केलाय.

Eknath Shinde: दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना बाळासाहेबांच्या शिवसेनेचं समर्थन कसं? एकनाथ शिंदेंचा सवाल, भाजपची स्क्रिप्ट वाचतायत?
ठाकरे विरुद्ध शिंदे
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 11:05 PM

मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजलीय. दोन्ही बाजूंनी टीका टिप्पणी आणि आरोप प्रत्यारोप सुरु झालेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडून शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार टीका सुरु आहे. अशावेळी एकनाथ शिंदे यांनी एक ट्वीट करत शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना एक सवाल केलाय. मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते? असा सवाल शिंदे यांनी केलाय.

एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल, राऊतांना प्रत्युत्तर

‘मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून उचललेलं हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर’, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

‘शिवसेना वाचविण्यासाठी मरण आलं तरी बेहत्तर’

‘हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर…. तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू…’, असंही शिंदे यांनी म्हटलंय.

दाऊद संबंधांचा नवाब मलिकांवर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून जेलमध्ये आहेत. नवाब मलिक यांचे डी गँगसोबत संबंध होते, असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे. मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात ईडीनं चार्जशीट दाखल केली होती. गोवावाला कंपाऊंड मिळवण्यासाठी कट रचल्याचा ठपका ईडीनं नवाब मलिकांवर ठेवलाय. मंत्री नवाब मलिक यांनी हसीना पारकरसोबत वारंवार बैठका घेतल्या आणि मनी लॉड्रिंग केलं, असं प्राथमिक निरीक्षण कोर्टानं नोंदवलं आहे. रोकडे यांच्या खंडपिठानं हे निरीक्षण नोंदवलं आहे. नवाब मलिक यांचा दाऊदच्या गँगमधील लोकांसोबत संबंध असल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलं आहे.

हसीना पारकर, सरदार शाहवली खान यांच्यासोबत नवाब मलिक यांच्या बैठका झाल्या असल्याचा ठपका ईडीनं नवाब मलिक यांच्यावर ठेवलाय. ‘मलिक हे हसीना पारकर, सलीम पटेल, सरदार शहावली खानच्या संपर्कात होते’ असा आरोप करण्यात आलंय. D गँगशी संबंध ठेवूनच मलिकांनी गोवावाला कंपाऊंडची जागा मिळवल्याचा आरोप नवाब मलिक यांच्यावर आहे.

मलिकांवरुन भाजप नेत्यांकडूनही सातत्याने ठाकरेंवर टीका

या पार्श्वभूमीवर भाजपकडूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर सातत्याने टीका होत आहे. नबाव मलिक जेलमध्ये आहेत. असं असताना त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही. तसंच त्यांच्या फोटोसह सरकारी निर्णय जाहीर केले जातात, यावरुन फडणवीस यांनीही उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.