Sanjay Raut : राऊतांच्या घरात पैशाच्या बंडलवर एकनाथ शिंदेंचं नाव, मुख्यमंत्री म्हणतात, ‘याची चौकशी करा”

मुख्यमंत्री म्हणतात, 'याची चौकशी करा"

Sanjay Raut : राऊतांच्या घरात पैशाच्या बंडलवर एकनाथ शिंदेंचं नाव, मुख्यमंत्री म्हणतात, 'याची चौकशी करा
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 8:07 AM

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांच्या (Sanjay Raut) घरी सापडलेल्या पैशाच्या बंडलवर प्रतिक्रिया दिली आहे. राऊतांच्या घरात एकनाथ शिंदे यांचं नाव असलेला एक पैश्यांचा बंडल मिळाला होता. त्यावर शिंदेंनी प्रतिक्रिया दिली आहे.” संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या कारवाईत पैश्यांच्या बंडलवर माझं नाव होतं. तर त्याची चौकशी करा. या प्रकरणामध्ये माझी चौकशी करण्यापेक्षा ज्यांच्या घरी पैसे सापडले त्यांची चौकशी करा”, असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली. त्यावर मंत्रिमंडळाचे विस्तार लवकरच होईल ते तुम्हाला माहिती मिळेल, असं शिंदे म्हणाल्या.

राऊतांच्या घरी एकनाथ शिंदेंच्या नावाचा बंडल

मुंबईतील १ हजार ३४ कोटींच्या पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज ईडीने ताब्यात घेतले आहे. सकाळी सात वाजता ईडीची टीम राऊत यांच्या घरी पोहचली आणि त्यानंतर साडे नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना त्यांच्या भांडुपमधील मैत्री या निवासस्थानातून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंचर ईडीने (ED)त्यांना मुंबईच्या फोर्ट परिसरातील ईडीच्या कार्यालयात आणले. ईडीच्या कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात आली. या छापेमारीच्या काळात संजय राऊत यांच्या घरातून 11 लाख 50 हजार रुपयांची रोख (cash)रक्कम जप्त करण्यात आली आहे. काही कागदपत्रेही ईडीने या कारवाईत जप्त केल्याची माहिती आहे. ही रोख रक्कम जप्त केल्यानंतर संजय राऊत यांना ही कॅश कुठून आली, याची विचारणा करण्यात आली. त्याच्यावर संजय राऊत समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत, अशी माहिती आहे. ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असं लिहिलेला पैश्याचा बंडल संजय राऊतांच्या घरी सापडला. हे पैसे पक्षाच्या कामासाठी खर्च करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं.

हे सुद्धा वाचा

शिंदेंचा पुणे दौरा

“माझं दोन दिवसाच्या राज्यामधला दौरांमध्ये सर्व विभागीय आयुक्त यांच्या बैठका होता सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठका घेतली तातडीने जे प्रश्न सोडवायचे ते सोडवले. दौराचा चांगला इम्पॅक्ट लोकांकडून मिळाला आहे. काही निर्णय प्रक्रियेमध्ये थांबले होते त्याला चालना मिळाली आहे. उद्या पुण्यामध्ये देखील अशा प्रकारचे दौरा माझा आहे. यामध्ये देखील पुण्याच्या कामाचा आढावा घेणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न त्याच्या देखील आढावा घेतला जाणार आहे.काही छोटे छोटे काम प्रालंबित आहेत त्याच्या पण देखील लवकरात निपटारा करून पूर्ण केला जाईल, असं एकनाथ शिंदे पुणे दौऱ्याविषयी म्हणालेत.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.