Eknath Shinde: नगरपंचायत निवडणुकीनंतर नगरपालिकेची रणधुमाळी, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

राज्यात सध्या नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका झाल्यानंतर नगरपालिकांच्या निवडणुका होतील,असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde: नगरपंचायत निवडणुकीनंतर नगरपालिकेची रणधुमाळी,  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
eknath shinde

ठाणे: राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) नगरपंचायतीच्या निवडणुका (Nagar Panchayat Election) पार पडल्यानंतर नगरपालिकांच्या (Municipal Council ) निवडणुका होतील, अशी माहिती दिली आहे. तर, नगरपालिका आणि महापालिका निवडणुका एकत्र होणार नाहीत, असंही ते म्हणाले. राज्यातील सर्व निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. मागील वर्षभरापासून रखडलेल्या अंबरनाथ आणि बदलापूर पालिकेच्या निवडणुका लवकरच होण्याची चिन्हं आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली आहे.

राज्यात टप्प्या टप्प्यानं निवडणुका

राज्यात सध्या नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका झाल्यानंतर नगरपालिकांच्या निवडणुका होतील, आणि त्यानंतर महापालिकांच्या निवडणुका होतील अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सर्व निवडणुका या एकत्र नव्हे, तर टप्प्याटप्प्याने होतील, असंही एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

अंबरनाथ बदलापूरवर प्रशासकीय राजवट

अंबरनाथ आणि बदलापूर पालिकांच्या सार्वत्रिक निवडणूक एप्रिल 2020 मध्ये होणं अपेक्षित होतं. मात्र कोरोनामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत, आणि नगरसेवकांचा कार्यकाळही संपला. त्यामुळं या दोन्ही पालिकांवर गेल्या दीड वर्षांपासून प्रशासकीय राजवट लागू आहे. या दोन्ही पालिकांची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत एकदा काढण्यात आली. मात्र, त्यानंतर नगरपालिका निवडणुका द्विसदस्यीय पॅनल पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. त्यामुळं आता पुन्हा एकदा नव्यानं प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत काढावी लागणार आहे. मात्र, या निवडणुका नगरपंचायत निवडणुका झाल्यावर होतील, अशी माहिती आता खुद्द नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सोबतच महापालिकांच्या निवडणुका या नगरपालिका निवडणुकांच्या नंतर होतील, असंही शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.

महापालिका निवडणुकीपूर्वी नगरपालिकेची रणधुमाळी

राज्यातील काही महापालिकांची मुदत एप्रिल महिन्यात संपत असून त्यानुसार एप्रिल महिन्यात महापालिकांच्या निवडणुका लागण्याची चिन्हं आहेत. तर नगरपालिका निवडणुका या त्यापूर्वी, म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता यानिमित्ताने निर्माण झाली आहे. त्यामुळं राजकीय पक्ष पुन्हा एकदा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचं पाहायला मिळतंय.

परदेशातून येणाऱ्यांची चाचणी करुन क्वारंटाईन करावं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व प्रशासनाने एयरपोर्ट प्रशासनाला सूचना दिल्या आहेत की, परदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची कोरोना टेस्ट करून त्यांना 14 दिवस क्वारंटाईन करूनच पुढे त्यांना शहरात प्रवेश करू द्यावा. तसेच हाय रिक्स देशातील प्रवाशांची माहिती तात्काळ द्यावी व त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करावे, तसेच ठाण्यात फक्त डोंबवलीत एका व्यक्तीला ओमिक्रॉन ची बाधा झालीय आणि तो ही सुखरूप आहे. जेवढे ठाण्यात परदेशातून प्रवाशी आलेत त्या सर्वांच्या करोना चाचण्या झाल्या असून, सर्वाना क्वारंटाईन करण्यात आले आहे, कोणीही मिसिंग नसून ,ओमिक्रॉनशी दोन हात करण्यासाठी ठाण्यातील सर्वच यंत्रणा सज्ज झाल्या आहेत त्यामुळे ओमिक्रॉनची भीती सध्या तरी ठाणेकरांना नसल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

इतर बातम्या:

Renault ची किफायतशीर कॉम्पॅक्ट SUV लाँचिंगसाठी सज्ज, Tata Punch ला टक्कर

एक खाते अनेक फायदे; जाणून घ्या पीपीएफ खात्यामधील गुंतवणुकीचे फायदे

Eknath Shinde said Municipal Council and Municipal Corporation election will conduct after Nagar Panchayat Elections

Published On - 6:32 am, Wed, 8 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI