Eknath Shinde : टाकलेल्या जाळ्यात एकनाथ शिंदे फसले, कडीकुलपातून बाहेर पडणं सध्यातरी मुश्किल

राज्यसभेच्या वेळी आमदारांच्यामध्ये शंका उपस्थित केली. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीच्यावेळी त्यांना विश्वास दाखवला, मुंबईतून गुजरातकडे पळवलं. गुजरात भाजप नेत्यांना असुरक्षित वाटत असल्याने त्यांनी गुवाहाटीला सगळ्यांना हालवलं.

Eknath Shinde : टाकलेल्या जाळ्यात एकनाथ शिंदे फसले, कडीकुलपातून बाहेर पडणं सध्यातरी मुश्किल
टाकलेल्या जाळ्यात एकनाथ शिंदे फसलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 8:08 AM

मुंबई – महाविकास आघाडीचं (MVA) सरकार स्थापन झाल्यापासून विरोधी पक्षाकडून त्यांना प्रत्येकवेळी डिवचण्याचा प्रयत्न केला जात आहे. अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवरती भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. त्यापैकी नवाब मलिक, अनिल देशमुख यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. तर अन्य नेत्यांची देखील चौकशी होणार असल्याचं भाजपकडून (BJP) वारंवार सांगितलं जात आहे. महाराष्ट्रात प्रत्येकवेळी केंद्रातल्या यंत्रणांकडून कारवाई केली जाते. हे मागच्या अडीच वर्षापासून सुरू आहे. मागच्या चार दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण अधिक तापलं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या (Shivsena) काही आमदारांना घेऊन बंड केल्याने सुरूवातीला अनेकांच्या भुवया उंचावल्या. गुजरातमधून आमदारांना गुवाहाटी येथे नेण्यातं आलं आहे. केंद्रीय यंत्रणांची आमदारांना भीती दाखवली जात आहे. त्याचबरोबर एकनाथ हे भाजपने टाकलेल्या फासात अडकले आहे. त्यांना गुवाहाटीमधून बाहेर निघणं आता शक्य नसल्याचं स्पष्ट दिसतंय.

भाजपाने टाकलेल्या जाळ्यात एकनाथ शिंदे फसले

राज्यसभेच्या वेळी आमदारांच्यामध्ये शंका उपस्थित केली. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीच्यावेळी त्यांना विश्वास दाखवला, मुंबईतून गुजरातकडे पळवलं. गुजरात भाजप नेत्यांना असुरक्षित वाटत असल्याने त्यांनी गुवाहाटीला सगळ्यांना हालवलं. तिथं भाजपचं सरकार असल्याने तिथं पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रोज आमदार तिथल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये दाखल होत आहेत. पण तिथं भाजपाने टाकलेल्या जाळ्यात एकनाथ शिंदे फसले आहेत. तिथं असलेल्या कडीकुलपातून त्यांना बाहेर शक्य नसल्याचं

एकजूट नसल्याची ओरड

महाराष्ट्रात असलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकजूट नसल्याची कायम ओरड विरोधकांनी केली आहे. सुरूवातीच्या काळापासून हे सरकार टिकणार नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं. परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आम्ही पाच वर्षे पुर्ण करू असा विश्वास त्यांनी वारंवार बोलून दाखविला आहे. तसेच सरकार व्यवस्थित काम करीत असल्याचे विरोधकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दिल्लीतील केंद्रीय यंत्रणांचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा वारंवार प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र सरकार कसं अडचणीत येईल असं आत्तापर्यंत विरोधकांनी धोरणं अवलंबलं होतं.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी ईडीच्या नोटीसा

महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या ईडीच्या कारवायांना सामोरे जावे लागणार असल्याचे भाजपचे नेते जाहीरपणे सांगत आहेत. त्यामुळे अनेकांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर अनेकदा महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी ईडीच्या नोटीसा, आयकर विभागाची चौकशी हे प्रकार महाराष्ट्रात सुरू आहेत. नवाब मलिक, अनिल देखमुख सध्या ईडीच्या ताब्यात आहेत.

तिथं मंत्री मंडळातील अनेक नेते जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.