सोशल मीडियावरून प्रचार करणं महागात, व्हॉट्सअॅप अॅडमिनला नोटीस

सध्याच्या काळात निवडणुकांचा प्रचार (Social Media Political Campaign in Nanded) केवळ प्रचारसभांपर्यंतच मर्यादीत राहिलेला नाही.

सोशल मीडियावरून प्रचार करणं महागात, व्हॉट्सअॅप अॅडमिनला नोटीस
'माघ मेला'मध्ये टेक्नेलॉजीसह सोशल मीडियाचा वापर

नांदेड: सध्याच्या काळात निवडणुकांचा प्रचार (Social Media Political Campaign in Nanded) केवळ प्रचारसभांपर्यंतच मर्यादीत राहिलेला नाही. प्रामुख्याने 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून सोशल मीडियाचा वापर प्रचंड वाढला आहे.या वाढत्या प्रचार माध्यमांसोबतच आता निवडणूक आयोगही सतर्क झाला आहे. याचाच परिणाम म्हणून नांदेडमध्ये निवडणूक विभागाने सोशल मीडियावरून प्रचार केल्याने 18 जणांना नोटीस (Election Commission Notice) दिली आहे. यात व्हॉट्सअॅप अॅडमिनचाही समावेश आहे. त्यामुळे या तरुणांना सोशल मीडियावरील प्रचार महागात पडल्याची चर्चा आहे.

नांदेड निवडणूक विभागाने सोशल मीडियाचा वापर निवडणूक प्रचारासाठी केल्याचा ठपका ठेवत 18 जणांना नोटीस दिल्या आहेत, अशी माहिती माध्यम नियंत्रक रवींद्र चव्हाण यांनी दिली. या प्रकरणी ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रचार करण्यात आला त्या व्हॉट्सअॅप ग्रुपच्या ऍडमीनला देखील नोटीस पाठवण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून याबाबत खुलासा मागण्यात आला आहे. निवडणूक विभागाने केलेल्या तपासात संबंधितांनी राजकीय प्रचारासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केल्याचं समोर आल्याचं सांगण्यात येत आहे.

सोशल मीडिया हे अत्यल्प दरात मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यासाठी आता वापरलं जात आहे. विशेष म्हणजे या प्रचारात येणाऱ्या खर्चाची कुठेही नोंद नसते. त्यामुळे निवडणूक आयोगाने उमेदवारांसाठी प्रचारात निश्चित केलेली खर्च मर्यादाही ओलांडली जात असल्याचं समोर आलं आहे. नांदेडमधील निवडणूक विभागाने केलेल्या या कारवाईनंतर आता या प्रकरणी कोणत्या शिक्षेची तरतुद आहे, यावर आळा घालण्यासाठी काही ठोस उपाययोजना तयार होणार की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI