बाबांना मी फक्त माझ्या शरीराचा मांसाचा एक तुकडा देतेय, लालू प्रसाद यादव यांच्या मुलीची भावूक पोस्ट

तुम्ही सगळ्यांनी सर्वकाही ठिक होईल, यासाठी प्रार्थना करा. बाबांनी पुन्हा यावं आणि लोकांचा आवाज बनावं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.. 

बाबांना मी फक्त माझ्या शरीराचा मांसाचा एक तुकडा देतेय, लालू प्रसाद यादव यांच्या मुलीची भावूक पोस्ट
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 05, 2022 | 10:07 AM

नवी दिल्लीः आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्यावर आज सोमवारी सिंगापूरमध्ये किडनी ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया केली जाईल. मुलगी रोहिणी आचार्य (Rohini Acharya) लालूंना किडनी दान करणार आहेत. काही दिवसांपूर्वीच रोहिणी यांनी यासंबंधीची माहिती दिली होती. आपल्या वडिलांना किडनी दान करणार म्हणजे फार काही करणार नाही तर फक्त माझ्या शरीराचा एक मांसाचा तुकडा काढून देणार आहे, अशा शब्दात रोहिणी यांनी भावना मांडल्या. एका ट्विटद्वारे व्यक्त केलेल्या या प्रतिक्रियेची पोस्ट व्हायरल होत आहे.

सिंगापूरमध्ये लालूप्रसाद यादव यांच्यावर आज शस्त्रक्रिया होत आहे. लालू प्रसाद यादव यांचे पुत्र तथा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हेदेखील सिंगापूरमध्ये पोहोचले आहेत.

मुलगी रोहिणी यादव यांनी आज ट्विट केलंय. लाखो करोडो जनतेला ज्यांनी आवाज दिला. त्यांच्यासाठी सगळे मिळून प्रार्थना करुयात… लालू प्रसाद यादव यांच्या आरोग्यासाठी जनतेनी प्रार्थना करण्याचं आवाहन रोहिणी यांनी केलंय.

बिहारमध्ये आज राष्ट्रीय जनता दल पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून ठिक ठिकाणी पूजा, अर्चना, होम हवन केले जात आहे.

लालू प्रसाद यादव यांना २५ नोव्हेंबर रोजी सिंगापूरला नेण्यात आलं. त्यांच्यासोबत पत्नी राबडी देवी, मुलगी मीसा भारती आणि त्यांचे पती शैलेष कुमार हेही होते.

लालू प्रसाद यादव यांच्यावरील शस्त्रक्रिया यशस्वी होईल. असंख्य लोकांच्या शुभेच्छा आमच्यासोबत आहेत. बहीण रोहिणी आचार्य या किडनी दान करतील, अशी प्रतिक्रिया त्यावेळी तेजस्वी यादव यांनी दिली होती. ऑक्टोबरमध्ये सिंगापूरला उपचारार्थ गेलेल्या लालू प्रसाद यादव यांना डॉक्टरांनी किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर आज ही शस्त्रक्रिया होत आहे.

रोहिणी आचार्य यांची भावूक पोस्ट…

किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या लालूंचे प्राण वाचवण्यासाठी रोहिणी आचार्य किडनी दान करत आहेत. त्यांनी हा निर्णय घेतल्यानंतर ट्विटरवर भावूक पोस्ट केली होती…

त्यात त्यांनी लिहिलंय… मी बाबांसाठी काहीही करू शकते. माझ्या मते शरीरातील फक्त मांसाचा एक छोटासा तुकडा मी देतेय.

तुम्ही सगळ्यांनी सर्वकाही ठिक होईल, यासाठी प्रार्थना करा. बाबांनी पुन्हा यावं आणि लोकांचा आवाज बनावं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे..

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.