AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारायण राणे आजही हऱ्या-नाऱ्याच्या भूमिकेत, विनायक राऊतांचा पुन्हा हल्लाबोल

इडीची कारवाई म्हणजे केंद्र सरकारच्या सुडाचं राजकारण आहे. अनिल परब (Anil Parab) यांनाही अशीच नोटीस देण्यात आली. हे ठरवून केलं जातंय. यंत्रणांचा दुरूपयोग होतोय, असा दावा विनायक राऊत यांनी केला. 

नारायण राणे आजही हऱ्या-नाऱ्याच्या भूमिकेत, विनायक राऊतांचा पुन्हा हल्लाबोल
शिवसेना खासदार विनायक राऊत, केंद्रीय मंत्री नारायण राणे
| Edited By: | Updated on: Aug 30, 2021 | 12:20 PM
Share

मुंबई : शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर हल्लाबोल केला. राणे आजही हऱ्या-नाऱ्याच्या भूमिकेत आहेत, हा स्वभाव जाणार नाही. ही विकृती आहे, असा घणाघात खासदार विनायक राऊत यांनी केला. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

इडीची कारवाई म्हणजे केंद्र सरकारच्या सुडाचं राजकारण आहे. अनिल परब (Anil Parab) यांनाही अशीच नोटीस देण्यात आली. हे ठरवून केलं जातंय. यंत्रणांचा दुरूपयोग होतोय, असा दावा विनायक राऊत यांनी केला.

कोकण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे लोकहिताची कामं करत आहेत, रणनीती आखण्याची गरज नाही. शिवसेनेला वाडीपर्यंत वाढवू, काही जरी झालं तरी कोकण हा शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे. जनआशिर्वाद यात्रेबद्दल विश्लेषण केलंय, 75 गाड्या मुंबईतून नेल्या. स्थानिकांचा प्रतिसाद नव्हता, असं राऊत म्हणाले.

राणेंच्या या नौटंकीनंतर कोकणात राणेयुक्त राडेबाज विकृती फोफावण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणवासीयांनी सावध राहावं, असं आवाहन त्यांनी केलं.

चंद्रकांत पाटलांसारख्या माणसाने असं वक्तव्य करता कामा नये. केंद्राच्या सूचनेला हरताळ फासण्याचं काम केलं जात आहे. गर्दीमुळे कोरोना वाढतोय, याला भाजपच जबाबदार आहे, असा आरोप करत, राऊत यांनी भाजपच्या मंदिरांबाबतच्या आंदोलनावर टीका केली.

न्यायालयावर आमचा विश्वास आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याचा जो कुणी प्रयत्न करेल, त्याला कोर्ट शिक्षा देईल.

नाणार प्रकरण बंद

नाणार प्रकल्प होणार नाही, हे प्रकरण बंद झालं आहे ते परत उकरणार नाही, पण बाजूला रिफायनरी व्हावी, यासाठी पाच गावातील 70 टक्के लोकांचा विरोध आहे तर 30 टक्के लोकांचं समर्थन आहे, त्यांचे अर्ज घेऊन मी मुख्यमंत्र्यांना आज भेटणार आहे. त्यावर ते निर्णय घेतील, असं विनायक राऊत यांनी सांगितलं.

VIDEO : विनायक राऊत यांचा नारायण राणे, भाजपवर हल्लाबोल

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.