जिनांची भाषा बोलणाऱ्या ओवेसींना दिलेलं प्रत्येक मत भारतविरोधी : भाजप खासदार तेजस्वी सूर्या

'मोहम्मद अली जीनांची भाषा बोलणाऱ्या असदुद्दीन ओवेसींना दिलेलं प्रत्येक मत देशविरोधी आहे तसंच ज्या मुल्यांवर भारत देश उभा आहे, त्या मुल्यांच्याविरोधात ओवेसींना होणारं मतदान आहे', अशी टीका भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी केली आहे.

जिनांची भाषा बोलणाऱ्या ओवेसींना दिलेलं प्रत्येक मत भारतविरोधी : भाजप खासदार तेजस्वी सूर्या
Follow us
| Updated on: Nov 24, 2020 | 9:03 AM

हैदराबाद : कर्नाटक भाजपचे युवा नेते तथा खासदार तेजस्वी सूर्या (Tejaswi Surya) यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलंय. ‘मोहम्मद अली जिनांची भाषा बोलणाऱ्या असदुद्दीन ओवेसींना दिलेलं प्रत्येक मत देशविरोधी आहे तसंच ज्या मुल्यांवर भारत देश उभा आहे, त्या मुल्यांविरोधात ओवेसींना होणारं मतदान आहे’, असं तेजस्वी सूर्या म्हणाले. (Every Vote to Given Asduddin owaisi against india says bjp MP Tejashwi Surya)

हैदराबाद महापालिका निवडणुकीच्या (Greater Hyderabad Municipal Corporation Election) प्रचारार्थ तेजस्वी सूर्या यांनी आवेषपूर्ण भाषण करत ओवेसी बंधूंवर टीकेची तोफ डागली. “ओवेसी बंधू जातीयवादी आणि दोन्ही समाजात फूट पाडणारे राजकारण करतात, त्यामुळे त्यांना दिलं जाणारं प्रत्येक मत भारतविरोधी तसंच देश ज्या मुल्यांवर उभा आहे त्याविरोधी आहे”, असं सूर्या म्हणाले.

“एमआयएमचे नेते रोहिंग्या मुस्लिमांना भारतात परत आणण्याची भाषा करतात पण विकासाची कोणतीही गोष्ट त्यांच्या तोंडातून निघत नाही. हैदराबाद महापालिका निवडणुकीत टीआरएस आणि एमआयएमला हरवत भाजपच जिंकेल”, असा विश्वास या निमित्ताने तेजस्वी सूर्या यांनी व्यक्त केला.

ओवेसींच्या तोंडी जिनांची भाषा

ओवेसी इस्लामवाद, फुटीरतावाद आणि जिन्नांसारख्या अतिरेकीपणाची भाषा बोलतात. देशातील प्रत्येक नागरिकाने ओवेसींच्या फूट पाडणाऱ्या आणि जातीयवादी राजकारणाविरोधात उभे राहिले पाहिजे, अशी टीका तेजस्वी सूर्या यांनी केली. येत्या 1 तारखेला होणाऱ्या हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवून दक्षिणेत भाजप आपलं द्वार उघडणार असल्याचा विश्वास देखील सूर्या यांनी व्यक्त केला.

आज हैदराबाद बदला, उद्या तेलंगणा बदलेल

आज हैदराबाद बदला, उद्या तेलंगणा बदलेल, परवा दक्षिण भारत बदलेल. संपूर्ण देश हैदराबादकडे पाहत आहे. तेलंगणात पुढील विधानसभा निवडणुकीची तयारी करत असलेला भाजप आता महापालिका निवडणुकीत आपली सर्व शक्ती पणाला लावत आहे. पक्षाचे सरचिटणीस भूपेंद्र यादव यांच्यासह प्रमुख नेत्यांवर ही कमान सोपवण्यात आली आहे.

(Every Vote to Given Asduddin owaisi against india says bjp MP Tejashwi Surya)

संबंधित बातम्या

ममता बॅनर्जींचा असदुद्दीन ओवेसींना झटका, अनेक नेत्यांचा MIM ला रामराम ठोकत TMC मध्ये प्रवेश

‘तरुणांचं बेरोजगारीवरुन लक्ष हटवण्यासाठी भाजपचं नाटक’, लव जिहादच्या मुद्द्यावर असदुद्दीन ओवेसी यांचं प्रत्युत्तर

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.