येत्या 48 तासात मला एक खून करावा लागणार, विजय शिवतारेंच्या मुलाचे फेसबुक अकाऊंट हॅक

माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा मुलगा विनय शिवतारे यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झालं (Vijay Shivtare Son Facebook Account Hack) आहे.

येत्या 48 तासात मला एक खून करावा लागणार, विजय शिवतारेंच्या मुलाचे फेसबुक अकाऊंट हॅक
Follow us
| Updated on: Aug 16, 2020 | 6:10 PM

मुंबई : माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा मुलगा विनय शिवतारे यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झालं आहे. त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन “नाईलाजास्तव येत्या 48 तासात मला एक खून करावा लागणार आहे !!!!” अशी पोस्ट करण्यात आली आहे. याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ने विजय शिवतारे यांना विचारले असता त्यांनी अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली.  (Vijay Shivtare Son Vinay Shivtare Facebook Account Hack)

मिळालेल्या माहितीनुसार, आज (16 ऑगस्ट) संध्याकाळी 4.30 च्या सुमारास माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा मुलगा विनय शिवतारे यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन एक धक्कादायक पोस्ट करण्यात आली. या पोस्टमध्ये “नाईलाजास्तव येत्या 48 तासात मला एक खून करावा लागणार आहे !!!!” असे लिहिले आहे.

याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ने माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना विचारले असता, त्यांनी अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली. काल रात्रीपासून हे अकाऊंट हॅक झाले आहे. याबद्दल सायबर सेलकडे तक्रार करणार आहे, असेही विजय शिवतारे यांनी सांगितले.

तसेच युवासेना विस्तारक सचिन बांगर यांनीही या पोस्ट खाली अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली आहे. “विनय विजयबापु शिवतारे यांचे Facebook अकाउंट Hack केले असून त्यांची बदनामी करण्याच्या दृष्टिकोनातून चुकीच्या पोस्ट viral केल्या जात आहेत, असेही ते म्हणाले. 

यासंदर्भात Cyber Crime सेलकडे तक्रार करण्यात आली असून लवकरच याबाबत कार्यवाही करून Account सुरक्षित करण्यात येईल. सर्वांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये..!!, असे आवाहन सचिन बांगर यांनी केलं आहे.  (Vijay Shivtare Son Vinay Shivtare Facebook Account Hack)

कोण आहेत विजय शिवतारे?

विजय शिवतारे हे शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत. पुण्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे ते माजी आमदार आहेत. 2009 आणि 2014 अशा दोनवेळा ते आमदार म्हणून निवडून आले. 2014 साली शिवसेना-भाजपने राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर, विजय शिवतारे यांच्याकडे जलसंपदा राज्यमंत्रिपदाची धुरा देण्यात आली होती.

संबंधित बातम्या : 

भररस्त्यात कुऱ्हाडीने वार, नागपुरात काँग्रेसच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या

ध्वजारोहणानंतर परतताना मध्येच ब्रेक, बंद धाब्याबाहेर बसून मंत्री शंकरराव गडाखांनी डबा खाल्ला

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.