केंद्राकडे मागण्यापेक्षा मुंबई मनपाच्या 68 हजार कोटीच्या ठेवीतून कर्जमाफी द्या : देवेंद्र फडणवीस

शेतकरी कर्जमाफी आणि अवकाळी पावसाने झालेली नुकसान भरपाई ठाकरे सरकारने तातडीने द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

केंद्राकडे मागण्यापेक्षा मुंबई मनपाच्या 68 हजार कोटीच्या ठेवीतून कर्जमाफी द्या : देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Dec 21, 2019 | 3:46 PM

नागपूर : शेतकरी कर्जमाफी आणि अवकाळी पावसाने झालेली नुकसान भरपाई ठाकरे सरकारने तातडीने द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis BMC farm loan waiver) यांनी आज विधानसभेत केली. “केंद्राने मदत करावी असं म्हणत बॉल टोलवू नये. तसं करायचंच असेल तर मग मुंबई महापालिकेच्या 68 हजार कोटी रुपयांच्या फिक्स डिपॉझिट बँकेत आहेत. मग त्या घेऊन मदत करा अशी मागणीही करता येईल” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. (Devendra Fadnavis BMC farm loan waiver)

मी ही मुख्यमंत्री होतो. प्रत्येक संस्थेचं आपआपल्या काही मर्यादा, क्षमता असतात, असं म्हणत फडणवीस यांनी राज्य सरकारने स्वत:च्या बजेटमधून काय करु शकतो हे जाहीर करण्याची मागणी केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त राजकीय बोलतात. मुख्यमंत्र्यांनी राजकीय भाषण सोडून राज्यासाठी काय करणार हे सांगावे. राज्यपालांकडे कारभार असताना त्यांनी शेतकऱ्यांना मदत दिली. मात्र त्याशिवाय या सरकारनं शेतकऱ्याला मदत केली नाही. २५ हजार हेक्टरी मदत शेतकऱ्याला तातडीने मिळाली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, आजच घोषणा करावी. आज शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. आज शेती शाश्वत केली पाहिजे. अतिवृष्टी, अवर्षण यातून शेतकऱ्याला बाहेर कसं काढता येईल हे पाहिलं पाहिजे”, असं त्यांनी नमूद केलं.

आमच्या सरकारने नानाजी देशमुख योजनेतून विदर्भात 6000 कोटींची कामं केली. माझी अपेक्षा आहे की ही योजना व्यवस्थित राबवली तर वातवरण बदलातून शेतीवर होणारे परिणाम कमी करता येतील. ज्या भागात पाणी आहे तेथे आत्महत्या होत नाहीत. आम्हाला प्रश्न विचारले जातात. आम्ही 5 वर्ष सत्तेत होतो. जमीन अधिग्रहणपासून अनेक गोष्टींना वेळ लागतो. गोसीखुर्द प्रकल्पातून आम्ही सिंचन वाढवलं. 2004 पासून प्रलंबित असलेल्या योजनांना मान्यता दिली. प्रकल्पांची घोषणा होते आणि जमीन अधिग्रहण होत नाही. त्यामुळे त्याचा फायदा होत नाही. 2009 ते 2014 मध्ये 3000 कोटी भूसंपादनासाठी मिळाले. आम्ही 5 वर्षात 16,688 कोटी रुपये दिले. नव्याने जुनी वसलेली गावं व्यवस्थित वसवली. 141 प्रकल्प पूर्ण झाले, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

आता 21 दिवस झाले, आम्ही फार मागणी केली नाही. कारण सरकारला वेळ दिली पाहिजे. पण तात्काळ मदत करावी, जी तुम्ही घोषणा केली ती पूर्ण केली पाहिजे, असं म्हणत फडणवीसांनी शेतकरी मदतीची मागणी लावून धरली.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.