AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया, शरद पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष

Ajit Pawar : शिवसेनेच्या फुटीला वर्ष पूर्ण झाले. त्यानंतर राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. आता हा भूकंप राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट अजित पवार यांच्यासोबत आला आहे. हा गट शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये सहभागी झाला आहे.

अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया, शरद पवार यांच्या भूमिकेकडे लक्ष
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 02, 2023 | 3:57 PM
Share

मुंबई : शिवसेना-भाजप युती सरकारला ३० जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले. मागील वर्षी शिवसेनेत फूट पडली होती. शिवसेनेचे ४० आमदार भाजपसोबत आले अन् राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शरद पवार यांची साथ सोडून भाजपसोबत आली. यानंतर राष्ट्रवादी काँग्रसेने पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

काय म्हटले राष्ट्रवादी काँग्रेसने

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले की, अजित पवार यांच्या बंडाला शरद पवार यांचा पाठिंबा नाही. हे भारतीय जनता पक्षाचे ऑपरेशन लोट्स आहे. लवकरच गेलेले सर्व आमदार परत येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

अजित पवार यांनी यापूर्वी २०१९ मध्ये बंड केले होते. त्यावेळी शरद पवार यांनी ते बंड मोडून काढले होते अन् फडणवीस सरकार काही तासांत कोसळले होते. आता अजित पवार यांचे बंड पुन्हा शरद पवार मोडून काढणार? अजित पवार यांच्यांसोबत गेलेले सर्व आमदार परत येतील, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूत्रांनी केली.

अजित पवार यांच्या गटातून कोण मंत्री

अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील हे मंत्री झाले आहेत. त्यातील छगन भुजबळ अन् दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे जवळचे असल्याचे समजले जात होते. परंतु ते ही आता अजित पवार यांच्यासोबत गेले आहे. त्यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आणण्यात शरद पवार यांना यश येणार का? हे येत्या काळातच स्पष्ट होणार आहे

Follow Us
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी