फडणवीसांना हिंदुंचा एवढा कळवळा तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही? कोळसे-पाटलांचा सवाल

देवेंद्र फणडणवीस यांनी शरजीलवर कठोर कारवाईची मागणी केल्यानंतर आता माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय.

फडणवीसांना हिंदुंचा एवढा कळवळा तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही? कोळसे-पाटलांचा सवाल
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 2:32 PM

पुणे : अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजील उस्मानी याच्या वादग्रस्त विधानानंतर आता राजकारण अधिक तापलं आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फणडणवीस यांनी शरजीलवर कठोर कारवाईची मागणी केल्यानंतर आता माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. देवेंद्र फडणवीस यांना हिंदुंचा एवढाच कळवळा आहे, तर मग उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही? असा सवाल कोळसे-पाटील यांनी विचारलाय.(Former Justice B.G. Kolse-Patil criticizes Devendra Fadnavis on Sharjeel Usmani issue)

इतकच नाही तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून स्वत:चं मुख्यमंत्रीपद पणाला लावलं, असा घणाघातही कोळसे-पाटील यांनी फडणवीसांवर केलाय. राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारेही हिंदूच आहेत. आमच्यार गुन्हे दाखल करायचे असतील तर करावेत. आमची भाषणं तपासावीत, आम्ही हिंदुंचा अपमान केलेला नाही, असा दावाही कोळसे पाटील यांनी केला आहे.

‘भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो’

30 जानेवारी रोजी पुण्यात पार पडलेल्या एल्गार परिषेदत शरजील उस्मानी यांने हिंदू समाज पूर्णत: सडका बनला आहे, असं विधान केलं होतं. शरजीलच्या या वक्तव्यावरुन भाजपनं आक्रमक पवित्रा घेत, तातडीने कारवाई करा अन्यथा रस्त्यावर उतरु, असा इशारा सरकारला दिला आहे. त्यावर बोलताना शरजीलच्या वक्तव्यामुळे भावना दुखावल्या असतील तर त्यांची मी माफी मागतो. शरजीलने हिंदू ऐवजी मनुवाद हा शब्द वापरायला हवा होता. मात्र, मी त्याचा निषेध करणार नाही आणि त्याच्या वक्तव्याचं समर्थनही करणार नाही, असं कोळसे-पाटील म्हणालेत.

फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

‘असा कुठला सडक्या डोक्याचा इसम महाराष्ट्रात येऊन हिंदूंना सडका म्हणत असेल आणि सरकार त्याच्यावर कारवाई करत नसेल तर भाजप स्वस्थ बसणार नाही. तात्काळ गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली नाही तर त्याविरोधात आम्ही आंदोलन करु,’ असा निर्वाणीचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिलाय. एल्गार परिषद ही फक्त आग ओकण्याकरता, समजात तेढ निर्माण करण्यासाठी होते, असं माहिती असूनही परवानगी कशी मिळते. या परिषदेत हिंदूंच्या विरोधात बोललं जात आहे ते सरकारच्या मर्जीनं बोललं जात आहे का? असा सवालही फडणवीसांनी केलाय.

शरजील उस्मानी याच्या वक्तव्याला 48 तास उलटून गेले तरी शिवसेनेचा एकही नेता त्याबाबत बोलला नाही. त्याबाबत बोलताना शिवसेना सत्तेला मिंधी झाली आहे. शिवसेना सत्तेला नतमस्तक झालीय. म्हणून ते यावर बोलूच शकत नाहीत, असा घणाघातही फडणवीसांनी केलाय.

शरजिल उस्मानी नेमकं काय म्हणाला?

‘भारतात स्वत:ला राष्ट्रवादी म्हणवून घ्यायचं असेल तर दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे तुम्हाला म्हणावं लागेल की काश्मीर आमचा अविभाज्य भाग आहे आणि दुसरं म्हणजे पाकिस्तान मुर्दाबाद. तर तुम्ही राष्ट्रवादी आहात. तुम्ही त्या व्याख्येत बसता. पाकिस्तानातही अशीच एखादी व्याख्या असेल. साऊत आफ्रिकेतही असेल. मी राष्ट्रवादाला मानत नाही. आजचा हिंदू समाज, हिंदुस्तानात हिंदू समाज वाईटरित्या सडला आहे. जुनैदला चालत्या रेल्वेमध्ये एक गर्दी 31 वेळा चाकू मारुन त्याची हत्या करते. तेव्हा कुणी अडवायला येत नाही. ते लोक तुमच्या आणि आमच्यातून येतात. हे लोक जे मॉब लिंचिंग करतात ते हत्या करण्याव्यतिरिक्त आपल्या घरी जाऊन काय करत असतील?, असा प्रश्न शरजीलने उपस्थित केला होता.

त्याचबरोबर, हे लोक असं काय करतात की हत्या करुन आल्यानंतर ते आपल्यासोबत बसतात, उठतात, जेवण करतात, सिनेमा पाहायलाही जातात. पुन्हा दुसऱ्या दिवशी कुणाला तरी पकडतात, पुन्हा हत्या करतात आणि पुन्हा नॉर्मल लाईफ जगतात. ते प्रेम करतात, वडिलांचे आशीर्वाद घेतात. मंदिरात पूजाही करतात. पण पुन्हा बाहेर येऊन तेच करतात. हे सर्व इतक्या सहतेनं सुरु आहे की, लिंचिंग होतेय काही हरकत नाही. यापूर्वी मुस्लिम व्यक्तीची हत्या करण्यासाठी एखादं कारण दिलं जात होतं. तो एखाद्या दहशतवादी संघटनेशी जोडलेला आहे. तो सीमीचा सदस्य आहे. या बॉम्बस्फोटाशी त्याचा संबंध आहे. आता मात्र कुठल्याही कारणाची गरज नाही. मुस्लिम आहे मारुन टाकू’,  असं वक्तव्य शरजिल याने एल्गार परिषदेत केलं आहे.

संबंधित बातम्या :

हिंदू समाज सडका झालाय म्हणणाऱ्या शरजिल उस्मानीविरोधात भाजपची तक्रार

हिंदू समाज सडका झालाय म्हणणारा शरजिल उस्मानी कोण आहे?

Former Justice B.G. Kolse-Patil criticizes Devendra Fadnavis on Sharjeel Usmani issue

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.